शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Navratri 2021: नवरात्रीत चुकूनही 'ही' कामं करू नका, मानलं जातं अशुभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 2:48 PM

1 / 9
Navratri Upvas Fasting Rules: आजपासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2021) सुरुवात झाली आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या दुर्गा पूजेचा हा नऊ दिवसांचा सण शारदीय नवरात्र म्हणून ओळखला जातो. हा सण देशाच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.
2 / 9
या नवरात्रीत काही विशेष नियमांचे भक्तांनी पालन केले पाहिजे, जे देवीची पूजा करतात आणि नवरात्रीमध्ये उपवास करतात. दरम्यान, नवरात्रोत्सवात काही कार्ये करण्यास विशेष मनाई आहे. त्याबद्दल जाणून घेऊया...
3 / 9
1. जर तुम्ही नवरात्रीमध्ये घट स्थापना करत असाल, माता की चौकीचे आयोजन करत असाल किंवा अखंड ज्योती पेटवत असाल तर या दिवसात घर रिकामे ठेवू नये, तसेच, पूजेचे घर अस्वच्छ ठेवू नये. असे केल्याने मातेचा आशीर्वाद मिळत नाही.
4 / 9
2. नवरात्री दरम्यान नखे काढणे वर्ज्य आहे. जर तुम्ही अजून नखे कापली नाहीत, तर आता नवरात्री संपल्यावरच ती कापून घ्या. जे नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करतात त्यांनी दाढी, मिशा आणि केस कापू नयेत. मात्र, या काळात मुलांची मुंडण करणे शुभ आहे.
5 / 9
3. नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने जेवणात कांदा, लसूण किंवा मांसाहार करू नये. नवरात्रीच्या काळात मांसाहार आणि अल्कोहोल इत्यादीपासून दूर राहिले पाहिजे. विष्णू पुराणानुसार, नवरात्रीच्या उपवासात दिवसा झोपू नये.
6 / 9
4. जे नऊ दिवस उपवास करतात त्यांनी काळे कपडे घालू नयेत. हा उपवास पूर्ण स्वच्छतेने ठेवावा. 9 दिवस उपवास करणाऱ्या व्यक्तीने चुकूनही घाण आणि न धुतलेले कपडे घालू नयेत. या दरम्यान, शिवणकाम-भरतकामासारखे काम करण्यास देखील मनाई आहे.
7 / 9
5. उपवासादरम्यान नऊ दिवस धान्य आणि मीठ खाऊ नये. कुट्टूचे पीठ, समारी तांदूळ, सिंघाड्याचे पीठ, साबुदाणा, सेंधा मीठ, फळे, बटाटे, शेंगदाणे जेवणात खाऊ शकता. नवरात्रीच्या उपवासादरम्यान फळे नेहमी एकाच ठिकाणी बसून खावीत.
8 / 9
6. जर तुम्ही नवरात्री दरम्यान दुर्गा चालीसा, मंत्र किंवा सप्तशती वाचत असाल तर ते वाचताना इतर कोणाशीही बोलू नये, असे केल्याने नकारात्मक ऊर्जा तुमच्या पूजेचे फळ घेऊन जाते. उपवास करणाऱ्या लोकांनी बेल्ट, चप्पल-शूज, पिशव्या यासारख्या चामड्याच्या वस्तू वापरू नयेत.
9 / 9
7. जे उपवास ठेवतात त्यांनी नऊ दिवस लिंबू कापू नये. जर तुम्ही उपवासादरम्यान फळे खात असाल तर ते एकाच वेळी संपूर्ण खा. नवरात्री दरम्यान उपवासाचे फळ मिळवण्यासाठी, एखाद्याने ब्रह्मचर्य उपवास करणे आवश्यक आहे.
टॅग्स :Navratriनवरात्रीDasaraदसरा