शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर महिन्यात 'या' सात राशींची होणार आर्थिक भरभराट ; तुमची रास यापैकी एक आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 08:00 IST

1 / 7
या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर आनंददायी ठरणार आहे. व्यवसायात वाढ होईल. नव्या योजना आखल्या जातील कौटुंबिक जीवन देखील आनंदी राहील. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळेल. व्यवसायातही नफा मिळेल. सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. बहिणीचे सहकार्य मिळेल. करिअरच्या दृष्टीने हा महिना शुभ आहे.
2 / 7
या महिन्यात तुम्हाला नशीबाची आणि कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. जर तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. धार्मिक कार्यात वाढ होईल. वैयक्तिक जीवन आणि कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुम्हाला अनुकूल असेल. प्रवासाचे योग येतील. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
3 / 7
या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदाने जाईल. विवाहेच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल. भागीदारी व्यवसायात लाभ होईल. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. नोकरदार लोकांनी तूर्तास नोकरी बदलाचा विचार करू नये. जिथे आहात तिथे पगार वाढ होईल. मान-सन्मान मिळू शकेल.
4 / 7
तुम्ही नोकरी करत असाल तर प्रमोशन होईल आणि जर तुम्ही व्यावसायिक असाल तर व्यवसाय वाढ होईल. आर्थिकदृष्ट्या परिस्थितीत सकारात्मक बदल होतील. जमीन, वाहन, घर खरेदीच्या संधी चालून येतील. आर्थिक व्यवहार सांभाळून आणि विचारपूर्वक करा, यश मिळेल.
5 / 7
हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. वाहन खरेदी करता येईल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. घरात मंगल कार्य ठरेल.
6 / 7
वृश्चिक राशीचे लोक आर्थिकदृष्ट्याही मजबूत असतात. ते नशीबाचे धनी देखील आहेत, परंतु कधीकधी ते स्वतःच्या कृतीने त्यांचे नशीब खराब करतात. त्यांच्यात मंगळाच्या प्रभावामुळे ते हट्टी असतात. ते नम्र राहिले तर लक्ष्मी मातेची कृपा होऊन त्यांची आर्थिक भरभराट संभवते.
7 / 7
हा महिना तुमच्यासाठी आर्थिक लाभाचा आहे. भागीदारीतही लाभ संभवतो. नोकरी बदलण्यासाठी, शहर बदलण्यासाठी आणि नवीन व्यवसायात पैसे गुंतवण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. मेहनतीनुसार तुम्हाला चांगले फळ मिळेल. आधी केलेल्या गुंतवणुकीचा मोबदला मिळू शकेल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. महिना आनंदात जाईल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष