शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:40 IST

1 / 15
नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ आताच्या घडीला सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत विराजमान आहे. सिंह राशीत केतुही विराजमान आहे. यामुळे शनि, राहु-केतु यांच्यासह मंगळाचे अशुभ युती योग जुळून आलेले आहेत. शनि ग्रहाशी षडाष्टक योग जुळून आला असून, राहुशी समसप्तक योग जुळून आला आहे. तसेच मंगळ आणि केतु युतीचा कुजकेतु योग सुरू आहे.
2 / 15
मंगळ ग्रह जुलै महिन्याची सांगता होताना राशीपरिवर्तन करणार आहे. या गोचरामुळे सदर शनि, राहु-केतु आणि मंगळ यांच्या तीनही अशुभ योगांची सांगता होणार आहे. परंतु, मंगळाने पुढील राशीत प्रवेश करताच शनिशी आणखी एक योग जुळून येत आहे. २८ जुलै २०२५ रोजी मंगळ सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करत आहे.
3 / 15
शनि मीन राशीत वक्री आहे आणि मंगळाने कन्या राशीत प्रवेश केल्यावर या दोन्ही ग्रहांचा समसप्तक योग जुळून येणार आहे. १३ सप्टेंबर २०२५ पर्यंत मंगळ कन्या राशीत असणार आहे. त्यामुळे शनि आणि मंगळाच्या समसप्तक योगाचे प्रतिकूल परिणाम पाहायला मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. असे असले तरी काही राशींना हा कालावधी अत्यंत शुभ, लाभदायक आणि सर्वोत्तम ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. ज्या लोकांचा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, त्यांना नफा मिळू शकतो. परदेशात सुरू असलेल्या व्यवसायात फायदा होऊ शकतो. आयात-निर्यात व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसू शकतात. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. आत्मविश्वास वाढू शकतो. कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर अनेक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.
5 / 15
वृषभ: शिक्षण क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळतील. परदेशात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मंगळाच्या गोचराचा फायदा होईल. धाडसी निर्णय घेऊन फायदा होईल. मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्यांना फायदेशीर परिस्थिती राहील. घर बांधणीशी संबंधित बाबींमध्ये पैसे खर्च होतील. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल तर तो सोडवता येऊ शकेल.
6 / 15
मिथुन: मंगळ गोचराने साहसी, निडर बनाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. सर्जनशीलता आणि उत्साह कायम राहील. आईशी असलेले नाते पूर्वीपेक्षा चांगले होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहन इत्यादी खरेदी करू शकता. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळवू शकाल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते.
7 / 15
कर्क: साहस, धैर्य आणि उत्साहाने परिपूर्ण राहू शकाल. कठीण वाटत असलेले काम सहज पूर्ण होऊ शकेल. मोठ्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याची संधी मिळू शकते जी फायदेशीर ठरेल. सासरच्या लोकांशीही सौहार्दपूर्ण संबंध असतील. त्यांना भेटण्याची संधी मिळू शकेल. मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना यश मिळू शकेल.
8 / 15
सिंह: अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. चांगल्या संधी मिळू शकतील. नवीन व्यवसायात नशीब आजमावू शकता. जुन्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. पैसे वाचवू शकता. समाजात आदर मिळू शकतो. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. कामात नशिबाची साथ मिळू शकेल. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.
9 / 15
कन्या: मंगळ गोचराने आनंद, सुख, समृद्धी आणि यश मिळू शकेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकेल. समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकेल. विचारसरणीने लोक प्रभावित होतील. एखादी नवीन गोष्ट सहजपणे शिकू शकाल. ज्याचा फायदे होऊ शकेल. कुटुंब आणि करिअरमध्ये चांगला समन्वय राखू शकाल. नफा मिळविण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतील.
10 / 15
तूळ: मंगळ गोचराने अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. गुंतवणूक करायची असेल तर योग्य सल्ल्याने करू शकता. भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे पैसे व्यवसायात किंवा येणाऱ्या काळात खर्च करू शकता. परदेश प्रवासाच्या संधी मिळू शकतात. पर्यटन किंवा परदेशी व्यापारातून चांगले उत्पन्न मिळवू शकता. परदेशात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तीर्थयात्रेला जाऊ शकता. परंतु, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
11 / 15
वृश्चिक: मंगळ गोचर शुभ ठरू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा मोठे ध्येय साध्य करण्यासाठी हा काळ योग्य असेल. सर्जनशील कौशल्य उच्च राहील. कला, लेखन क्षेत्रात यश मिळू शकेल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.
12 / 15
धनु: मंगळ गोचर शुभ ठरू शकते. काम आणि व्यवसायात यश मिळू शकते. तसेच, या काळात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. नोकरीत प्रभाव वाढू शकतो. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकते. व्यावसायिकांना फायदेशीर सौदे आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
13 / 15
मकर: मंगळ गोचर मंगलमय ठरू शकते. घरी काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. ध्येय साध्य करण्यास ग्रहमान मदत करू शकेल. कोणत्याही अभ्यासक्रमात, संशोधनात किंवा धार्मिक कार्यात सहभागी असाल तर, या काळात यश आणि प्रेरणा मिळेल. स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. जमीन, घर, प्रवास किंवा रिअल इस्टेट या माध्यमातून नफा मिळू शकतो. परदेशात आयात-निर्यात व्यवसायात फायदा होऊ शकतो.
14 / 15
मीन: वैवाहिक जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. गुरू हा मीन राशीचा स्वामी आहे. मंगळ गुरुशी मैत्रीपूर्ण आहे. यावेळी भागीदारीत व्यवसाय केला तर हा काळ फायदेशीर ठरू शकतो. सामाजिक जीवनात मान-सन्मान वाढेल. नेतृत्व कौशल्ये वाढतील. लोक निर्णयांचा आदर करतील.
15 / 15
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास