शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:31 IST

1 / 6
महाभारतातील कथेनुसार, उडुपीचा राजा पेरुंजोत्रुथियन याने सर्वांना जेवू घालण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्याच्या स्वयंपाकाचा अंदाज एवढा अचूक होता की एकही योद्धा उपाशी राहिला नाही की एक दिवसही अन्न वाया गेले नाही. पण हा राजा होता तरी कोण? त्याला ही जबादारी कशी मिळाली ते पाहू.
2 / 6
महाभारतातील मुख्य कथानकाबरोबर अनेक उपकथाही अतिशय रंजक आणि बोध घेण्यासारख्या आहेत. अन्नाची व्यवस्था कशी करावी, अन्न कसे वापरावे आणि वाया जाण्यापासून कसे रोखावे याचे उत्तर जणू काही या कथेतून मिळते.
3 / 6
महाभारतातील युद्धासाठी जेव्हा कुरुक्षेत्राचे रणांगण निवडले गेले तेव्हा श्रीकृष्णासह कौरव आणि पांडवांना हे समजले होते की या युद्धात लाखो योद्धे सहभागी होणार आहेत. अशा परिस्थितीत, आपल्या दूरदृष्टीसाठी प्रसिद्ध असलेले भगवान श्रीकृष्ण यांनी योद्ध्यांना अनेक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल माहिती दिली. या गोष्टींमध्ये योद्ध्यांसाठी अन्नाची व्यवस्था करण्याची महत्त्वाची बाब देखील समाविष्ट होती. जेव्हा ही बातमी उडुपीचा राजा पेरुंजोत्रुथियानला पोहोचली तेव्हा तो श्रीकृष्णाला भेटायला गेला आणि हात जोडून विनंती केली की तो युद्धात सहभागी होणार नाही पण महाभारतातील योद्ध्यांसाठी अन्नाची व्यवस्था नक्कीच करेल.
4 / 6
कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर दररोज हजारो योद्धे मृत्युमुखी पडत असत. अशा परिस्थितीत दुसऱ्या दिवशी किती अन्न तयार करायचे याचा हिशेब ठेवणे खूप कठीण होते. कारण नवे योद्धे युद्धात सामील होण्यासाठी पोहोचत असत. त्यामुळे स्वयंपाकाचा अंदाज कसा घ्यावा याबद्दल राजाने श्रीकृष्णाचे मार्गदर्शन घेतले.
5 / 6
उडुपीचा राजा त्याची समस्या घेऊन श्रीकृष्णांकडे गेला. तिथे त्याने हात जोडून श्रीकृष्णांना दुसऱ्या दिवशी किती अन्न शिजवायचे हे कसे ठरवायचे याबद्दल माहिती मागितली. उडुपीच्या राजाचे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण हसले आणि शेंगदाणे खायला सुरुवात केली. उडुपीच्या राजाला समजले की श्रीकृष्णाच्या या हास्याचा काहीतरी अर्थ असावा.
6 / 6
उडुपीच्या राजाला श्रीकृष्णाच्या हसण्याचा आणि शेंगदाणे खाण्याचा अर्थ समजला होता. त्याने अंदाज लावला की श्रीकृष्णाने जितके शेंगदाणे खाल्ले तितकेच योद्धे दुसऱ्या दिवशी युद्धात मारले जातील. जसे की दहा शेंगदाणे खाल्ले म्हणजे दुसऱ्या दिवशी दहा हजार योद्धे मारले जातील. याचा अर्थ असा, की श्रीकृष्ण स्वतः काळाचे रूप धारण करून त्या योद्ध्यांना गिळंकृत करत असत. त्याच वेळी, जितके शेंगदाणे शिल्लक तितके योद्धे जिवंत राहत असत. हे लक्षपूर्वक पाहून राजा स्वयंपाक करत असे. यामुळेच की काय, १८ दिवस चाललेल्या या युद्धात अन्नाची कमतरता भासली नाही आणि ते वायाही गेले नाही. प्रामाणिकपणे काम आणि कृष्णावर समर्पण केल्यामुळे राजाच्या हाताला यश आले, तसे आपल्यालाही यावे वाटत असेल तर कृष्णाला शरण जा हा संदेश यातून मिळतो.
टॅग्स :Mahabharatमहाभारतfoodअन्न