Maha Shivratri 2022 : महाशिवरात्रीपासून पुढचा संपूर्ण महिना 'या' चार राशींसाठी ठरणार भाग्योदयाचा काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 14:16 IST
1 / 5ज्योतिष शास्त्रानुसार यंदाची महाशिवरात्री चार राशीच्या लोकांसाठी नशीब बदलणारी ठरू शकते. महाशिवरात्रीच्या दिवसापासून संपूर्ण महिनाभर या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. हा फायदा कोणाला आणि कोणत्या स्वरूपात होणार आहे ते जाणून घेऊ. 2 / 5मार्च २०२२ मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ करून देईल. नोकरी-व्यवसायात लाभाची शक्यता राहील. या महिन्यात आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक कामात यश मिळेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नशिबाची साथ मिळाल्याने अवघड कामे देखील सहज पूर्ण होतील. तुमच्या कामांचे कौतुकही होईल. चांगली बातमी मिळेल.3 / 5कर्क राशीच्या लोकांसाठी मार्च महिना नोकरी आणि व्यवसाय दोन्हीसाठी शुभ राहील. व्यवसायात मोठा फायदा होईल. नोकरीच्या शोधात असाल तर नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. नवीन काम सुरू करणाऱ्यांनाही यश मिळेल. धनलाभ होईल.4 / 5वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मार्च २०२२ चे राशी भविष्य सांगते की हा महिना त्यांना प्रत्येक कामात शुभ परिणाम देईल. नवीन नोकरी मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. धनलाभ होईल, पैशाशी संबंधित समस्या संपतील. पैशासोबतच पद आणि मानसन्मानही मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे.5 / 5मार्च २०२२ मीन राशीच्या लोकांसाठी खूप आनंद घेऊन येईल. करिअरमध्ये यश मिळेल. व्यावसायिकांचे मोठे सौदे अंतिम होऊ शकतात. जुने व्यवहार मार्गी लावण्यासाठी उत्तम काळ आहे. धनलाभ होईल. पैशासाठी नवीन मार्ग मिळतील. हा महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवहारासाठी चांगला काळ. मानसन्मान मिळेल. एकूणच हा काळ सर्वांगीण लाभ देणारा आहे.