1 / 5ज्योतिष शास्त्रात अशी काही चिन्हे आहेत जी चांगल्या काळाची सुरुवात होणार असल्याचे भाकीत वर्तवतात. एरव्ही सामान्य वाटणाऱ्या या घटना संकटकाळात दिलासादायक ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या विषयावर ज्योतिषशास्त्र काय सांगते.2 / 5तळ हाताला खाज येणे हा आर्थिक प्राप्तीचा संकेत मानला जातो. असे मानले जाते की पुरुषाच्या उजव्या तळहाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताच्या तळव्याला वारंवार खाज येत असेल तर ते शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तसेच आर्थिक अडचणी संपुष्टात येणार आहेत. 3 / 5जर तुम्ही स्वप्नात एखादी पूजा सुरु असल्याचे पाहिले आणि मंत्र ऐकले तर ते देखील शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळू शकते. आणि लवकरच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. 4 / 5जर तुम्हाला तुमच्या घरात मुंग्या खालून वर जाताना दिसल्या तर ते तुमच्यासाठी शुभ लक्षण असू शकते. त्याचा संबंध प्रगतीशी जोडलेला दिसतो. अशा परिस्थितीत त्यांना हाकलून देण्याऐवजी त्यांना पीठ खायला द्या. कालांतराने त्या निघून जातात. 5 / 5हिंदू धर्मात शंख मुख्यतः पूजेदरम्यान वापरला जातो. जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर शंखध्वनी कानावर पडला तर ते खूप चांगले लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात येणारी आव्हाने लवकरच संपणार आहेत. आणि सगळं काही मंगल होणार आहे.