फेंग शुई नुसार घरात लांब-रुंद पानांची रोपं लावण्याचे ५ फायदे जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 12:39 IST
1 / 6अनेक प्रकारच्या वनस्पतींना रुंद पाने असतात. बागेत आपण रोपं लावतोच, परंतु घराच्या कोपऱ्यात, खिडकीत, हॉल मध्ये लावलेली रोपं घराचा देखावा अधिक आकर्षित करतात. त्यासाठी विशेषतः सावलीत वाढणारी रोपं मिळतात. घराच्या सुशोभीकरणासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. फेंगशुई शास्त्र सांगते, ही रोपं केवळ आकर्षक नाही, तर लाभदायक देखील असतात. कशी ते पाहू!2 / 6हिरवीगार, टवटवीत रोपं डोळ्यांना आणि मनाला तजेला देतात. फेंगशुई नुसार लांब आकाराच्या पानांची रोपं घरात आनंद आणतात. यामुळे घराचा प्रत्येक कोपरा उत्साहाने भरून जातो.3 / 6अशा रोपांची रुंद पानं घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. तसेच प्राणवायू सोडून वातावरणात प्रसन्नता निर्माण करतात. 4 / 6घराचा आग्नेय कोपरा संपत्ती आणि समृद्धीचा कोपरा मानला जातो, म्हणून विशेषतः येथे रुंद पानांची झाडे लावावीत.5 / 6घरात जेवढी आकर्षक रोपं असतात, तेवढी घरात वेगाने प्रगती होते. म्हणून आपले घर तसेच आजूबाजूचा परिसर निसर्गसंपन्न ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा. 6 / 6घरात तणावाचे वातावरण राहत असेल, तर हिरव्यागार वेली, छोटी रोपं, लांब रुंद पानांची रोपं, आकर्षक फुलझाडांचा वापर करावा. त्यामुळे घरातील ताण तणाव कमी होण्यास मदत होते.