शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Numerology: ‘या’ ४ मूलांक असलेल्या लोकांना आगामी काळ शुभ; यश, नफा अन् लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:07 IST

1 / 9
ज्योतिषशास्त्र असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. (Numerology)
2 / 9
अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.
3 / 9
नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. तसेच एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. याला भाग्यांक असेही म्हटले जाते.
4 / 9
हा भाग्यांक आपल्याला जन्मतारीखेवरून काढता येतो. या भाग्यांकावरून आपल्याला आपले भविष्य समजू शकते. खरं तर, जन्मपत्रिकेत भाग्यांक दिलेला असतो. मात्र, ज्या व्यक्तींना त्यांचा भाग्यांक माहीत नाही, ती व्यक्ती स्वतः देखील भाग्यांक काढू शकते.
5 / 9
काही मूलांकाच्या व्यक्तींना आगामी काही दिवस शुभ जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या कालावधीत हाती घेतलेले कामात यश प्राप्त होऊ शकेल. व्यवसाय, उद्योजकांना फायदा होऊ शकेल, जाणून घेऊया...
6 / 9
ज्या व्यक्तीचा मूलांक १ आहे, ती खूप भाग्यवान समजली जाते. यांना आगामी काळ विशेष ठरू शकेल. व्यवसायिकांना चांगला नफा होऊ शकेल. वैवाहिक जीवनातील मतभेत दूर होऊ शकतील. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जे काम करताय, त्यामध्ये तुमचे कौतुक होऊ शकेल. नवे काम सुरू करण्यासाठी उपयुक्त काळ ठरू शकतो.
7 / 9
ज्या व्यक्तींचा मूलांक ४ आहे, ते खूप महत्वकांक्षी मानले जातात. आगामी काळात या व्यक्तींना फायदा मिळू शकेल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होऊ शकेल. आगामी काही दिवस व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी चांगले ठरू शकतात. आर्थिक स्तरावर वृद्धी पाहायला मिळू शकते.
8 / 9
ज्या व्यक्तींचा मूलांक ७ आहे, ती लोक स्वावलंबी असल्याचे सांगितले जाते. स्वतः मेहनत करून भविष्य घडवण्याची ताकत या व्यक्तींमध्ये असते. या व्यक्तींना आगामी दिवस खूप महत्वाचे ठरू शकतात. या कालावधीत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम काळ असला, तरी योग्य सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. याचा चांगला फायदा होऊ शकतो.
9 / 9
ज्या व्यक्तींचा मूलांक ९ आहे, त्यांना आगामी काळात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गांना पदोन्नती आणि वेतनवृद्धीचे योग जुळून येऊ शकतात. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष