शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन
  • "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
  • हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
  • म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
  • एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
  • मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
  • आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे 
  • तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे 
  • माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
  • कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
  • कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
  • आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
  • मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल
  • वरळी डोमचं गेट तोडून कार्यकर्ते आत शिरले, तुफान गर्दी, पोलिसांची तारांबळ

महाभारत युद्धावेळी श्रीकृष्णाचे नेमके किती वय होते? वाचा, अद्भूत तथ्ये

By देवेश फडके | Updated: January 19, 2021 19:05 IST

1 / 7
श्रीविष्णूंच्या दशावतारांपैकी सर्वाधिक गाजलेले अवतार म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण. श्रीरामांनी स्वतःच्या आचरणातून मर्यादा पुरुषोत्तम ही बिरुदावली सार्थ केली, तर कोणत्याही संकटावर बुद्धिचातुर्य आणि योग्य व्यक्तींच्या सहाय्याने मात करण्याची शिकवण श्रीकृष्णाने दिली. महाभारताचा खरा महानायक म्हणून श्रीकृष्णाकडे पाहिले जाते. हातात एकही शस्त्र न घेता श्रीकृष्णाने महाभारताचे युद्ध पांडवांना जिंकून दिले. मात्र, यामुळे पांडवांचा पराक्रम कमी होत नाही.
2 / 7
प्रत्यक्ष महाभारत युद्ध भूमीवर अवघ्या जगाला भगवद्गीतेचे अमृतज्ञान श्रीकृष्णांनी दिले. गीतेचे तत्त्वज्ञान समजून घेता घेता उभे आयुष्य कमी पडेल, असा श्रीकृष्णाचा महिमा आहे. अनेकांनी श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेवर संशोधन केले आहे. केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील अभ्यासकांसाठी गीताज्ञान आणि श्रीकृष्णांचे चरित्र औत्सुक्याचा विषय आहे.
3 / 7
महाभारत युद्धात तत्कालीन गांधार, मद्र, सिंध, काम्बोज, कलिंग, सिंहल, दरद, अभीषह, मागध, पिशाच, कोसल, प्रतीच्य, ब्राह्मिक, उदीच्य, अंश, पल्लव, सौराष्ट्र, अवन्ति, निषाद, शूरसेन, शिबि, वसति, पौरव, तुषार, चूचुपदेश, अशवक, पाण्डय, पुलिन्द, पारद, क्षुद्रक, प्राग्ज्योतिषपुर, मेकल, कुरुविन्द, त्रिपुरा, शल, अम्बष्ठ, कैतव, यवन, त्रिगर्त, सौविर आणि प्राच्य आदी प्रांत; तर, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, मद्रनरेश शल्य, भूरिश्वा, अलम्बुष, कृतवर्मा, कलिंगराज, श्रुतायुध, शकुनि, भगदत्त, जयद्रथ, विन्द-अनुविन्द, काम्बोजराज, सुदक्षिण, बृहद्वलसहित अन्य हजारो योद्धे कौरवांच्या बाजून लढले.
4 / 7
महाभारत युद्धात बरेचसे प्रांत आणि योद्धे पांडवांच्या बाजूनेही होते. यात, पांचाल, चेदि, काशी, करुष, मत्स्य, केकय, सृंजय, दक्षार्ण, सोमक, कुन्ति, आनप्त, दाशेरक, प्रभद्रक, अनूपक, किरात, पटच्चर, तित्तिर, चोल, पाण्ड्य, अग्निवेश्य, हुण्ड, दानभारि, शबर, उद्भस, वत्स, पौण्ड्र, पिशाच, पुण्ड्र, कुण्डीविष, मारुत, धेनुक, तगंण आणि परतगंण आदी प्रांत; तर, द्रौपदीचे पाचही पुत्र, सात्यकि, उत्तमौजा, विराट, द्रुपद, धृष्टद्युम्न, अभिमन्यु, पाण्ड्यराज, घटोत्कच, शिखण्डी, युयुत्सु, कुन्तिभोज, उत्तमौजा, शैब्य आणि अनूपराज नीलसह शेकडो योद्धे पांडवांच्या बाजूने लढले होते, असे सांगितले जाते.
5 / 7
तब्बल अठरा दिवसांनंतर महाभारत युद्ध अखेरीस शमले. महाभारत युद्धानंतर कौरवांकडून तीन आणि पांडवांकडून १५ असे एकूण १८ योद्धे जिवंत राहिले होते. युयुत्सु हा कौरव पांडवांच्या बाजूने लढल्यामुळे तो एकच कौरव म्हणून जिवंत राहिला. पांडवांकडून युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कृष्ण, सात्यकी आदी जिवंत राहिले.
6 / 7
महाभारताचे महानायक म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. एका संशोधनानुसार महाभारत युद्ध झाले, त्यावेळी श्रीकृष्ण ८९ वर्षांचे होते, असे सांगितले जाते. महाभारत युद्धाच्या तब्बल ३६ वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या १२५ व्या वर्षी श्रीकृष्णांनी अवतार कार्याची सांगता केली, अशी मान्यता आहे.
7 / 7
भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाचा अंत आणि कलियुगाची सुरुवात यांच्या संधिकालात विद्यमान होते. एक उत्तम व्यवस्थापक, नियोजनकर्ता, धोरणी अशा अनेक भूमिका श्रीकृष्णांनी महाभारत युद्धावेळी अगदी चोख बजावल्या. कलियुगाची सुरुवात होण्यापूर्वी ६ महिने आधी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला महाभारताच्या युद्धाचा आरंभ झाला होता, असे सांगितले जाते.
टॅग्स :Mahabharatमहाभारतwarयुद्ध