Dream: स्वप्नात दिसल्या या गोष्टी तर समजू जा बदलणार आहे नशीब, मिळेल गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 17:34 IST
1 / 7 झोपल्यावर सर्वांनाच स्वप्न पडत असतात. काही चांगली, काही वाईट, काही अगदी खास. पण प्रत्येकाला स्वप्नात काही ना काही दिसतं असतं. मात्र स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणं हे भाग्यकारक असतं. आज जाणून घेऊयात त्याबाबत. 2 / 7जर तुम्हाला स्वप्नात शिवशंकराचं मंदिर दिसलं आणि तिथे तुम्ही पुजाऱ्याकडून प्रसाद घेत असाल तर भगवान शिवशंकराच्या कृपेने तुम्हाला मोठं सरप्राइज मिळणार आहे, असं समजून जा. 3 / 7जर तुम्हाला स्वप्नामध्ये मधमाशांचं पोळं दिसलं तर हा खूप मोठा शुभसंकेत असू शकतो. त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच खूप पैसा मिळणार आहे, असा होऊ शकतो. 4 / 7जर तुम्हाला स्वप्नामध्ये आंब्याचं झाड दिसलं तर याचा अर्थ तुमची भविष्यामध्ये खूप प्रगती होणार आहे असा असू शकतो. 5 / 7 जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखादी तरुणी किंवा महिला दिसली तर त्याचा अर्त आहे की तुम्हाला ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे. तसेच तुमची आर्थिक स्थितीही भक्कम होणार आहे. 6 / 7स्वप्नात जर दुभती गाय दिसली तर तोही मोठा शुभसंकेत असते. त्याचा अर्थ तुमच्या सुखसमृद्धीमध्ये वाढ होणार आहे असा होतो. 7 / 7जर तुम्हाला स्वप्नामध्ये गुलाब दिसलं तर तोही शुभसंकेत असतो. त्याचा अर्थ तुमचं काही तरी मोठं काम संपन्न होणार आहे, असा होतो.