शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचं आहे टेन्शन?, मग हे सात उपाय करून पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 23:15 IST

1 / 7
कुबेराची उपासना व पूजा करणाऱ्यावर त्यांची अपार कृपा असते. कुबेराची मूर्ती घरात पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि त्याची नियमित पूजा करा. कुबेर महाराजांना नियमितपणे शमीची पाने अर्पण करा.
2 / 7
जर तुम्ही कर्जामुळे जास्त त्रासलेले असाल तर जगप्रसिद्ध असलेल्या उज्जैनमधील ऋणमुक्तेश्वराच्या मंदिरात पिळ्पूजा करून कर्जापासून मुक्ती मिळवू शकता. शहरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर मोक्षदायिनी शिप्रा नदीच्या काठी वसलेले आहे.
3 / 7
पुन्हा पुन्हा कर्ज फेडल्यानंतरही तुम्ही पुन्हा कर्जात अडकत असाल तर शंकराच्या पिंडीवर ऊसाचा रस अर्पण करून ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा १०८ दिवस जप करावा. तुमची समस्याही देवाला सांगा. असे केल्याने हळूहळू कर्जापासून मुक्ती मिळते असं मानलं जातं.
4 / 7
जर तुम्हाला सातत्यानं कर्जाची समस्या उद्भवत असेल तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा, तसंच देवाकडे कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. शनिवारी पिंपळाच्या झाडावर सर्व देवांचा वास असतो असं मानसं जातं. त्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं.
5 / 7
कर्जमुक्तीसाठी २१ शनिवार हनुमान मंदिरात जाऊन श्रद्धेने ११ वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे. यामुळे कर्जमुक्ती तर होईलच, पण तुमचा व्यवसायही वाढतो असं म्हटलं जातं.
6 / 7
कर्जापासून दिलासा हवा असेल तर देवी लक्ष्मीची पूजा करा. त्यांच्यासमोर नैवेद्यही दाखवा. मनोभावे प्रार्थना करून त्यांच्यासमोर तुमची समस्या सांगा. यामुळे हळूहळू तुमच्यावरील कर्ज उतरतं असं म्हटलं जातं.
7 / 7
कर्जमुक्तीसाठी रोज लाल मसूराचे दान करावे. यामुळे कर्ज हळूहळू कमी होऊ शकते. तसेच मंगळवारी शिवलिंगाला मसूर आणि जल अर्पण करावे आणि ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नम: चा जप करावा. (टीप - सदर माहिती सामान्य गृहितकांवर आधारित असून यासंदर्भात तज्ज्ञ जाणकार व्यक्तींशी सल्लामसलत करणे अतिशय उपयुक्त ठरू शकेल.)
टॅग्स :Astrologyफलज्योतिष