1 / 6२७ एप्रिल रोजी शुक्राने मीन राशीत प्रवेश केला होता, तर १२ मे रोजी गुरूने मीन राशीत प्रवेश करणार आहे. आता शुक्र आणि गुरूचा हा संयोग २३ मे पर्यंत राहणार आहे. शुक्र त्याच्या उच्च राशीत, मालव्य योग आणि गुरु स्वतःच्या राशीत असल्यामुळे हंस राजयोग तयार होत आहे. हा समृद्धी योग कोणत्या राशींच्या वाट्याला येणार आहे ते पाहू!2 / 6कर्क राशीच्या नवव्या घरात शुक्र-गुरु युती राहील. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायात अधिक लाभ मिळण्यासोबतच नोकरीतही चांगली बातमी मिळेल. कर्क राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. प्रत्येक कामात यश मिळेल. यामुळे उत्पन्न झपाट्याने वाढेल.3 / 6या राशीत शुक्र आणि गुरूची सप्तम दृष्टी असल्यामुळे तुम्हाला प्रेमात अपार यश मिळेल. धनवृद्धीसोबत नशीब साथ देईल आणि आनंदही मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामाची प्रशंसा होईल. व्यवसायात चांगले यश मिळेल. नव्या कामाची सुरुवात करण्यास हा काळ अत्यंत अनुकूल ठरेल. 4 / 6या राशीच्या पाचव्या घरात शुक्र-गुरु युती आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत नवी भरारी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. वैवाहिक जीवनावरही चांगला परिणाम होईल. आजवर अडलेल्या कामांना तीव्र गती मिळून गुरुपाठबळ मिळेल आणि त्याचा संपूर्ण आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल. 5 / 6या राशीमध्ये शुक्र आणि गुरूचा संयोग दुसऱ्या घरात होत आहे. व्यावसायिकांना फायदा होईल. कौटुंबिक जीवन देखील आनंद आणि शांततेने जाईल. नवी नाती आनंद देतील. आयुष्याला नवे वळण मिळून घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. 6 / 6पहिल्या घरात शुक्र-गुरु युती होत आहे. या संयोगाने, या राशीच्या लोकांना त्यांच्या आर्थिक स्थितीसह अन्य बाबतीतही नशिबाची साथ मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळेल. व्यवसायात अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे.