Gudhi Padwa wishes 2021 : मित्र-मैत्रिणींसह प्रियजनांना हे मेसेज पाठवून गुढीपाडव्याचा उत्सव करा साजरा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 18:53 IST
1 / 10गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पण सध्या मागच्या वर्षीप्रमाणेच कोरोना व्हायरसच्या पाश्वभूमीवर गुढीपाडवा आपल्याला साजरा करता येणार नाही. म्हणजेच घराबाहेर पडता येणार नाही अशा स्थितीत तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तींना मॅसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता. 2 / 10नवीन वर्षाची नवी ही सुरुवात, सुरुवात करु नवीन क्षणांची, या मंगल दिनाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!3 / 10श्रीखंड पुरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नव वर्ष जावो छान! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!4 / 10शांत निवांत शिशीर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोळीळेच्या सुरुवाती सोबत, चैत्र-पाडवा दारी आला! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!5 / 10स्वागत नव वर्षाचे, आशा – आकांक्षांचे, सुख – समृद्धीचे, पडता पाऊल दारी गुढीचे, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!6 / 10भल्या सकाळी, गुढी उभारू, नवं वर्षाचे करू स्वागत, सामील होऊ शोभायात्रेत, आनंदाची उधळण करीत… “गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.7 / 10मिळूनी आपण गुढी उभारू, होऊनी सारे एक, सर्वीकडे पोचवू आपण, पर्यावरणाचा संदेश… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!8 / 10सर्व रस्ते सजले आहेत, छान सुंदर रांगोळ्यांनी, शोभा यात्रा फुलुनी गेली, माणसांच्या ताटव्यानी…. “गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.9 / 10झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी, काय कोणी मिळविले? पूर, दुष्काळ, वादळात सर्वस्व गमाविले……. थांबुवया हे सारे आपण, करुनी पुन्हा वृषारोपण, झाडे लावू, झाडे जगवू, वसुंधरेला पुन्हा सजवू, पर्यावरणाच्या गुढीसंगे, करू नववर्षाचे स्वागत…“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.10 / 10चला उभारू पुन्हा आता, पर्यावरणाची गुढी, स्वागत करू नववर्षाचे, पोचवू हा संदेश घरोघरी…. “गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.