शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलींनो, तुमचा जोडीदार 'या' अद्याक्षराचा असेल तर तुमच्यासारख्या भाग्यवान तुम्हीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 16:17 IST

1 / 5
आपल्या नावाचे अद्याक्षर हे सहसा राशीवरून ठरते. त्यामुळे नावाला राशीचे गुण आपोआप चिकटतात. एवढेच नाही तर वागणुकीवरून आणि अद्याक्षरावरून रासही ओळखता येते, एवढा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास आहे. परंतु अनेक जण आपल्या पाल्याचे पाळण्यातले नाव राशीवरून आणि बारशाचे नाव आवडीवरून ठेवतात. इथे उल्लेख केलेली आद्याक्षरे राशीनुसार नावं ठेवलेल्यासाठी आहेत याची नोंद घ्यावी. त्यानुसार दिलेले भाकीत ताडून पहावे.
2 / 5
ज्योतिषशास्त्रानुसार अ अक्षराने नाव सुरू होत असलेले लोक स्वभावाने खूप रोमँटिक असतात. ती आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात. मुलींना ही मुले खूप आवडतात.
3 / 5
ज्या मुलांचे नाव द, ड अक्षराने नाव सुरू होणारी मुले अंतःकरणाने शुद्ध असतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विशेष प्रकारची मोहिनी असते. ही मुले आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करतात आणि त्याच्यावर खूप प्रेम करतात.
4 / 5
ज्या मुलांचे नाव न अक्षराने सुरू होते, ती स्वभावाने साधी असतात आणि कोणाचेही मन सहज आकर्षित करू शकतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या जोडीदारासोबत उभे राहण्याची खासियत त्यांना इतरांपेक्षा वेगळे करते.
5 / 5
ज्या मुलांचे नाव प अक्षराने सुरू होते त्यांची विनोदबुद्धी अद्भुत असते. त्याच्या बोलण्यावर मुली भाळतात. आपल्या जोडीदाराला खूश ठेवण्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष