फेंगशुई वास्तू टिप्स: तीन पायांचा बेडूक तुमच्या घरावर करेल पैशांचा वर्षाव; पाहा योग्य दिशा आणि लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:58 IST
1 / 8फेंगशुई (Feng Shui) आणि वास्तुशास्त्र हे दोन्ही घरात सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) आणि नशीब आकर्षित करण्यावर भर देतात. योग्य वस्तू योग्य दिशेला ठेवल्यास घरात सुख-शांती, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य नांदते. बेडूक, कासव यांसारख्या घरात ठेवता येण्याजोग्या काही महत्त्वाच्या वस्तू आणि त्यांचे लाभ पाहू. 2 / 8आनंद, यश आणि आर्थिक समृद्धीचे प्रतीक. मुख्य दरवाजासमोर एका टेबलावर ठेवावा. त्याची उंची साधारणपणे ५० सें.मी. (दोन फूट) असावी. तो कधीही जमिनीवर किंवा बाथरूमजवळ ठेवू नये. 3 / 8यामुळे दीर्घायुष्य, स्थैर्य, संरक्षण आणि आर्थिक प्रगती हे लाभ होतात. हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. धातूचे कासव (Metal Turtle): उत्तर दिशेला ठेवल्यास करिअर आणि व्यवसायात प्रगती होते. तर लाकडी कासव (Wooden Turtle) पूर्व दिशेला ठेवल्यास आरोग्य आणि दीर्घायुष्य वाढते. कासवाची जोडी वैवाहिक जीवनात आनंद आणि सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी मदत करते.4 / 8बांबूचे रोप फेंगशुईमधील पाच तत्वांचे प्रतिनिधित्व करते आणि खूप शुभ मानले जाते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी नशीब आणि समृद्धी आणते. हे रोप लिव्हिंग रूम (Living Room) किंवा डायनिंग टेबलवर ठेवणे शुभ ठरते.5 / 8मासे आणि पाणी दोन्ही आर्थिक संपन्नता आणि ऊर्जा प्रवाह दर्शवतात. जे, घरात पैसा आणि नशीब आकर्षित करतात. फिश टॅन्क नेहमी ईशान्य (North-East) किंवा आग्नेय (South-East) दिशेला ठेवावे. मासे नेहमी ९ (आठ सोनेरी आणि एक काळा) च्या संख्येत असावेत, कारण ९ हा फेंगशुईमध्ये शुभ अंक आहे.6 / 8हा कमळाचा क्रिस्टलचा आकार घरातून नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतो आणि प्रेम, सद्भावना निर्माण करतो. वैवाहिक जीवनात गोडवा टिकवून ठेवतो. हे लोटस बेडरूमच्या नैऋत्य दिशेला ठेवल्यास प्रेमसंबंध सुधारतात.7 / 8या बेडकाच्या तोंडात एक नाणे असते, जे धन-समृद्धीचे प्रतीक आहे. ज्यामुळे घरात पैसा आणि आर्थिक संधींचा प्रवाह वाढतो. तो नेहमी मुख्य दरवाजाच्या दिशेने आतल्या बाजूला (घराकडे तोंड करून) ठेवावा, म्हणजे धन घरात प्रवेश करेल. तो जमिनीवर किंवा स्वयंपाकघरात ठेवू नये. ग्रह नक्षत्रात बेडूक हे पावसाचे प्रतीक असते तसेच वास्तुशास्त्रात हा तीन पायाचा बेडूक घरावर धन वर्षावाचे प्रतीक मानले जाते. 8 / 8कोणतीही वस्तू ठेवताना, ती स्वच्छ असावी आणि तिच्याकडे पाहताना तुमच्या मनात सकारात्मक भावना असावी. तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू त्वरित घरातून काढून टाकाव्यात, कारण त्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तुमचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि आकर्षक असावा, कारण येथूनच घरात ऊर्जा आणि नशीब प्रवेश करते.