शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Feng Shui Tips : आपल्या घरी ठेवा ‘हे’ छोटंसं रोपटं, नांदेल सुख-समृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 20:16 IST

1 / 7
Feng Shui Tips For Bamboo Plant : वास्तुशास्त्राप्रमाणेच फेंगशुईमध्येही वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या झाडं आणि रोपट्यांबद्दल सांगण्यात आलं आहे. दरम्यान, एक रोपटं आपल्या घरात लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होण्यासोबतच सुख-समृद्धी येते असे म्हटले जाते.
2 / 7
घरामध्ये बांबूचे रोप लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि घराचे वातावरण शुद्ध राहते. घराव्यतिरिक्त तुम्ही ते तुमच्या ऑफिस किंवा दुकानातही ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया बांबू रोपाशी संबंधित काही खास टिप्स…
3 / 7
फेंगशुईनुसार, बांबूचे रोप अशा ठिकाणी लावावे जेथे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसतात. म्हणजेच हे रोप तुम्ही ड्रॉईंग रूम किंवा कॉमन हॉलमध्ये ठेवू शकता. ही वनस्पती ठेवण्यासाठी पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्परांमधील संबंध चांगले राहतात असे म्हटले जाते.
4 / 7
फेंगशुईनुसार, घर किंवा ऑफिसमध्ये बांबूचे रोप ठेवल्याने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येते आणि आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होते. बांबूचे रोप सुख आणि समृद्धीसाठी तसेच नातेसंबंधांसाठी चांगले मानले जाते.
5 / 7
पती-पत्नीमधील संबंध चांगले नसतील तर बांबूचे देठ लाल फितीत बांधून काचेच्या भांड्यात ठेवावे आणि त्यात पाणी भरावे. ते कोरडे होणार नाही याची काळजी घ्या. जर ते कोरडे झाले तर ते काढून टाका आणि दुसरे रोप ठेवा.
6 / 7
एवढेच नाही तर घरात बांबूचे रोप ठेवल्याने आर्थिक परिस्थितीही सुधारते असे म्हटले जाते. यामुळे धनलाभ होण्याचे योगही बनतात. फेंगशुईनुसार धनाशी संबंधित कामात यश मिळविण्यासाठी बांबूचे रोप पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.
7 / 7
याशिवाय बांबूची रोप मुलांना अभ्यासात यश मिळवण्यासाठी शुभ मानली जाते. फेंगशुईनुसार मुलांच्या खोलीत बांबूची चार छोटी रोपे लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (टीप- सदर माहिती सामान्य गृहितकांवर आधारित असून संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते.)
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र