शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

विशेषतः 'अशी' गणेशमूर्ती घरात वापरू नका आणि भेट म्हणूनही देऊ नका : वास्तुशास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 14:27 IST

1 / 4
बाथरूमची भिंत किंवा आपल्या बेडरूममध्ये गणेशाची मूर्ती ठेवू नये किंवा फोटोदेखील लावू नये. तसे केल्याने वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.
2 / 4
आपल्या घरात किंवा कोणाला भेट देताना गणपतीची नृत्य करणारी मूर्ती देऊ नये. बाप्पाच्या या नानाविध कला असल्या, तरी त्या प्रदर्शनीय नाहीत. ज्याप्रमाणे युद्ध हे बाप्पाच्या व्यक्तिमत्त्वाचे अंग आहे, त्याप्रमाणे १४ विद्या ६४ कलांमध्ये पारंगत असणे हा बाप्पाचा गुणविशेष आहे. ती त्याची मूळ ओळख नाही. म्हणून कलह सदृश स्थिती टाळण्यासाठी नृत्यमग्न गणपतीचा वापर टाळला पाहिजे.
3 / 4
मुलगी सासरी जाताना तिला गोपालकृष्ण आणि अन्नपूर्णा देवी देण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे अनेक जण वैवाहिक आयुष्याची मंगलमयी सुरुवात व्हावी म्हणून गणपतीची मूर्तीही देतात. मात्र ती मूर्ती चुकून उजव्या सोंडेची असेल तर तिचे यमनियम पाळावे लागतात. पावित्र्य जपावे लागते. म्हणून मुलीला किंवा कोणालाही गणेशमूर्ती भेट म्हणून द्यायची असेल, तर ती स्थानांपन्न झालेली, आशीर्वाद देणारी आणि डाव्या सोंडेची मूर्तीच द्यावी.
4 / 4
इच्छित मनोकामनापूर्तीसाठी, तसेच कोणी संतानप्राप्तीच्या प्रतीक्षेत असेल, तर त्यांना शेंदरी रंगाची गणेश मूर्ती द्यावी. व ती मूर्ती नेहमी नजरेसमोर राहील अशा जागी ठेवायला सांगावी. या मूर्तीच्या नित्य दर्शनाने व्याधी दूर होतात, यशप्राप्ती होते आणि इच्छापूर्ती देखील होते.
टॅग्स :ganpatiगणपतीVastu shastraवास्तुशास्त्र