Dussehra 2021 : दसऱ्याच्या दिवशी राशीनुसार दिलेले उपाय करा आणि 'विशेष' लाभ मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 18:18 IST
1 / 12मेष राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी गणपतीची पूजा करावी व गणरायाला लाडू आणि दुर्वा अर्पण कराव्यात. 2 / 12वृषभ राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करावी. कारण रावणाशी लढण्यापूर्वी श्री रामानेही शिवाची पूजा केली होती.3 / 12दसऱ्याच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी महिषासुरमर्दिनीच्या दिव्य रूपाची पूजा करून महिषासुर मर्दिनी स्तोत्राचे पठण करावे. 4 / 12कर्क राशीच्या लोकांनी दसऱ्याला दुर्गा मातेच्या किंवा काली मातेच्या देवळात जाऊन दर्शन घेतले पाहिजे. 5 / 12दसऱ्याच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी गरजूंना अन्नदान तसेच वस्त्रदान करावे. 6 / 12कन्या राशीच्या लोकांनी शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि यशाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून रामरक्षा म्हणावी. 7 / 12 तूळ राशीच्या लोकांनी दसऱ्याला हनुमंताची पूजा आणि उपासना करावी. 8 / 12वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी अन्नदान करणे लाभदायक ठरेल. 9 / 12धनु राशीच्या लोकांनी गणपतीला लाडू अर्पण करून त्याची पूजा करावी.10 / 12मकर राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी गरिबांना अन्नदान केल्यास त्यांची साडेसातीची पीडा कमी होईल. 11 / 12कुंभ राशीच्या लोकांनी दसऱ्याला दुर्गेचे दर्शन घेऊन दुर्गा स्तोत्र म्हणावे. 12 / 12मीन राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी ११ वेळा रामरक्षा किंवा मारुती स्तोत्राचे पठण करावे.