शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीत जुळून आले आहेत धनयोग आणि राजयोग; ते कोणत्या राशींच्या नशिबात बदल घडवणार ते पाहू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 12:42 IST

1 / 7
जानेवारी महिन्यात रवी, बुध आणि शनी हे ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहेत, तर धनु राशीत मंगळ, कुंभ राशीत गुरु आणि राहू वृषभ राशीत तर केतू वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ही सर्व ग्रहस्थिती धनयोग आणि राजयोग निर्माण करणारी आहे. तिला बुधादित्य स्थिती असेही म्हणतात. या महिन्यात अमृत सिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी हे योग देखील आहेत. या सर्वाचा अनुकूल परिणाम पुढील राशींवर बघायला मिळेल.
2 / 7
मेष राशीसाठी हा महिना उत्तम ग्रहस्थिती देणारा आहे. कल्पक किंवा सृजनशील कार्यात लोकांना भरघोस यश मिळू शकते. त्याचा प्रभात आर्थिक स्थितीवर पडून भरभराट होऊ शकते. घरात मंगल कार्याचे देखील योग आहेत.
3 / 7
नोकरी, व्यवसाय आणि वैवाहिक आयुष्यासाठी हा काळ अतिशय सुखद ठरणारा असेल. वारसा हक्काने धन धान्य मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे आपली पद प्रतिष्ठा नक्कीच वाढणार आहे.
4 / 7
या राशीसाठी हा महिना अतिशय लाभदायक आहे. ज्या क्षेत्रात रस घ्याल तिथे यश मिळू शकेल. फक्त स्वभावावर नियंत्रण ठेवा म्हणजे कार्यसिद्धी होईल. आयुष्याला नवे वळण मिळण्यासाठी हा काळ अनुकल आहे.
5 / 7
या महिन्यात नोकरी, व्यवसायात पदोन्नती होईल, वाढ होईल. मोठी संधी चालून येईल. त्या संधीचे सोने करा. आर्थिक वृद्धी होण्यासाठी त्या संधीचा निश्चित हातभार लागणार आहे.
6 / 7
धन, संपत्ती, ऐश्वर्य प्राप्तीचे मार्ग खुले होतील. विकासाच्या नवीन वाटा सापडतील. लोकप्रियता वाढेल. कौटुंबिक स्थिती सुधारेल तसेच आर्थिक भरभराट होईल.
7 / 7
या महिन्यात नशीब तुमच्या बरोबर असेल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. आर्थिक प्रश्न सुटतील. व्यापारात प्रगती तसेच नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यातही शुभ वार्ता समजतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष