शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Budh Transit April 2022 : बुध करणार वृषभ राशीत प्रवेश; या राशीच्या लोकांचा होणार भाग्योदय, मिळणार अपार धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 21:20 IST

1 / 7
बुध हा व्यक्तीतील ज्ञान, बुद्धिमत्ता आणि विनोद वृत्तीचे प्रतिनिधित्व करतो आणि अनेक परिस्थितींमध्ये हा ग्रह खूप लाभदायक मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह उत्तम स्थितीत असतो, त्या व्यक्ती तल्लख, ज्ञानी आणि बुद्धिमान असतात.
2 / 7
दुसरीकडे, जर तुमच्या राशीत बुध नकारात्मक स्थितीत असेल तर व्यक्तीला निर्णय घेण्यात त्रास होतो आणि चिंताही सतावते. २५ एप्रिलला बुध राशी बदलणार आहे. बुध शुक्राची राशी वृषभमध्ये गोचर करणार आहे. या राशीत बुधाचं गोचर अनेक राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम देणारे ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी बुधाचं गोचर सकारात्मक ठरेल.
3 / 7
वृषभ राशीत बुधाचे गोचर या राशीच्या जातकांसाठी उत्तम फळ देणारं ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची उत्तम साथ मिळेल. तुमची आर्थिक बाजूही अधिक भक्कम होईल. ज्या लोकांनी नव्या घराचा विचार केला आहे, त्यांच्यसाठीही हा काळ उत्तम ठरू शकतो. बुधाच्या कृपेमुळे तुमच्या मान सन्मानात वृद्धी होईल. यादरम्यान तुम्हाला व्यापारातही लाभ संभवतो. बुधाचं गोचर आरोग्याच्या दृष्टीनंही उत्तम ठरणार आहे.
4 / 7
कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचं गोचर हे लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान, नोकरी करणाऱ्यांना बढतीचे योग संभवतात. इतकंच नाही तर तुम्हाला वेतनवाढ मिळण्याचीही शक्यता आहे. आर्थिक बाबींसाठी हा काळ तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर त्यावरही तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. यादरम्यान, तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रपरिवारासोबत चांगला वेळ घालवता येईल. या कालावधीत तुमचं आरोग्यही चांगलं राहील.
5 / 7
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचं गोचरं उत्तम ठरणार आहे. यादरम्यान या राशीच्या व्यक्तींच्या रचनात्मक क्षमता आणि अन्य कोशल्य वृद्धी होईल. इतकंच नाही तर या राशीचे लोक आपली कामं कुशलतेनं आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे प्रयत्न करतील. यादरम्यान जमिनीच्या खरेदीसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. तुमच्या वैयक्तिक जीवनातही सकारात्मक राहाल. कुटुंबातही शांततेचं वातावरण राहील. आरोग्याच्या दृष्टीनंही हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. परंतु यात कोणतीही हयगय करू नये.
6 / 7
बुध गोचरदरम्यान वृश्चिक राशीच्या लोकांच्या मान सन्मानात वाढ होईल. याशिवाय व्यापारी वर्गाच्या लोकांना नव्या लोकांच्या संपर्कात येण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभाचेही योग संभवतात. या कालावधीत नव्या स्त्रोतांच्या माध्यमातूही कमाईचे योग संभवतात. आरोग्याच्या दृष्टीनंही हा चांगला कालावधी ठरणार आहे.
7 / 7
मकर राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचं गोचर नफा कमावण्याची संधी देणारा ठरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा कालावधी अतिशय चांगला ठरणार आहे. विद्यार्थ्यांचं संपूर्ण लक्ष आपल्या अभ्यासाकडे केंद्रीत राहील. खासगी जीवनातही सकारात्मक परिणाम दिसतील. प्रेमविवाहासाठीही हा कालावधी चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीनं हे गोचर सकारात्मक ठरेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष