शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Breathing Techniques: जितके जलद श्वास घ्याल, तेवढे आयुष्य कमी होईल; प्राणायाम करा दीर्घायुषी व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 07:00 IST

1 / 5
खोल श्वास घेण्याचा अर्थ स्पष्ट करताना प्राण विज्ञान विशेष तज्ञ डॉक्टर मेकडॉवल म्हणतात की ' प्राणायामामुळे फुफ्फुसांनाच नाही तर पोटाच्या संपूर्ण पचनसंस्थेला ही परिपूर्ण पोषण मिळते. खोल श्वास रक्‍तशुद्धीसाठी अमूल्य औषध घेण्यासारखे आहे. मनुष्याची कार्यक्षमता वाढवणे,त्यात स्फुर्ती व उल्हास जागवण्यात खोल श्वास घेण्याचा अभ्यास महत्त्वपुर्ण भुमिका निभावतो.म्हणूनच दिर्घायुष्यासाठी दररोज सातत्याने प्राणायाम करणे आवश्यक आहे.
2 / 5
धापा टाकणारे जनावर याचा पुरावा आहेत, धापा टाकण्याची गती जेवढी तीव्र असेल, मरण्याची निश्चितता तेवढी वाढेल हे एक शास्त्रीय तथ्य आहे. जसे कबूतर एक मिनिटात ३७ वेळा श्वास घेते आणि केवळ ९ वर्ष जिवंत राहते. ससा देखील दर मिनिटाला ३९ वेळा श्वास घेतो आणि त्याचे वय जवळपास ९ वर्ष मानले गेले आहे. कुत्रा १ मिनिटात २९ श्वास घेतो आणि १३ वर्षे जिवंत राहतो. बकरी १ मिनिटात २४ वेळा,तर हत्ती १ मिनिटात ११ वेळा श्वास घेऊन १०० वर्ष जिवंत राहतो. कासव १ मिनिटात केवळ ४ श्वास घेऊन १५० वर्षांचे दीर्घायुष्य जगतो.
3 / 5
मनुष्यासाठी सामान्यतः जीवेत् शरद शतम् ची म्हण प्रचलित आहे. याचा अर्थ आहे की त्याच्या श्वासांची गती निश्चित असेल तर तो किमान 100 वर्ष जगू शकेल, अर्थात ११ ते १२ श्वास दर प्रति मिनिट त्याने घेतले पाहिजेत.
4 / 5
सद्यस्थितीत मनुष्याच्या श्वासाचा दर वाढल्याने त्याचे आयुष्य घटले आहे. सरासरी आयुष्य ६० ते ६५ वर्ष राहिले.अनेक आधुनिक शास्त्रज्ञांचे मानणे आहे की जर मनुष्याच्या शारीरिक तापमानाला अर्धे केले जाऊ शकले, तर तो सहजपणे १०० वर्षांपर्यंत जगू शकतो, यासाठी त्याला आपल्या श्वासाच्या गतीला साधून प्रमाण मर्यादित करावे लागेल. याचा अर्थ आहे ' मनुष्याच्या श्वासाच्या गतीला प्रति मिनिट २ ते ३ श्वास नियंत्रित करणे गरजेचे आहे.' हे खूप आव्हानात्मक तर आहे पण अशक्य नाही. प्राचीन काळात ऋषींच्या दीर्घायुष्याचे रहस्य मनुष्याच्या श्वासाच्या गतीमध्ये लपले आहे. म्हणून आपण आपल्या श्वासाच्या गतीला साधण्यासाठी प्रथम तर श्वास - उच्छश्वासाच्या पद्धतीला समजणे आवश्यक आहे. ते समजण्याचा मार्ग म्हणजे प्राणायाम.
5 / 5
श्वासाच्या दोरीवर मानव जीवन आणि त्याचे आरोग्य टिकलेले आहे. श्वास जेवढा स्थिर, मजबूत असेल जीवन तेवढेच स्वस्थ आणि निरोगी राहील. श्वासात जेवढी जास्त गतिशीलता, तीव्रता येईल आरोग्याच्या शक्यता तेवढ्याच कमी होत जातील. हे शास्त्रीय तथ्य आहे. कारण श्‍वासाचा सरळ संबंध शरीराच्या तापमानाशी आहे.ज्या तीव्रतेने श्वास गतिशील होईल, त्याच प्रमाणात शरीराच्या तापमानात वाढ होईल. क्रोध, आवेश, उत्तेजनाच्या स्थितीमध्ये श्वासाच्या दरात अशा प्रकारची वाढ होते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स