शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सावधान! सप्टेंबर महिन्यात या पाच राशींवर असेल शनी देवाची वक्र नजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 08:00 IST

1 / 6
जेव्हाही शनी राशी बदलतो, त्याचा थेट परिणाम एकाच वेळी ५ राशींवर होतो. सध्या शनी मकर राशीत आहे आणि एप्रिल २०२२ मध्ये तो कुंभ राशीत प्रवेश करेल. दरम्यान, मकरसाठी काही काळ क्लेषदायक असेल. शनी कुंभ राशीत प्रवेश करताच मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू होईल. दुसरीकडे, राशी बदलताच, धनु राशीवर साडेसाती संपेल. तथापि, शनीच्या साडेसातीचा दुसरा, तिसरा टप्पा अनुक्रमे मकर आणि कुंभ राशीवर चालेल. याशिवाय कर्क आणि वृश्चिक राशीवर शनीचा प्रभाव दिसेल.
2 / 6
शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा या राशीच्या लोकांसाठी भाग्यकारक ठरणार आहे. साडे साती संपता संपता अविस्मरणीय भेट देणारी ठरू शकते. आपल्या हातून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही याची काळजी घ्या अन्यथा शनी देवांचा रोष ओढवून घ्याल.
3 / 6
मकर राशीसाठी साडेसातीचा मध्य टप्पा आहे. या महिन्यात तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. कर्ज घेणे टाळता आले तर उत्तम अन्यथा आर्थिक व्यवहार गुंतागुंतीचे ठरू शकतात.
4 / 6
या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना आनंद घेऊन येईल. या राशीतले लोक शनीच्या साडेसातीच्या पहिल्या टप्प्याला सामोरे जात आहेत. धनदेवतेच्या घरात शनिदेवाची उपस्थिती त्यांना लाभ देईल आणि चांगली गुंतवणूक देखील करेल. करिअरमध्येही यश मिळेल.
5 / 6
पुढचा काही काळ तुम्ही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वाहन चालवताना सावध राहिले पाहिजे. त्यामुळे अपघाताचे प्रसंग टाळता येतील. आर्थिक व्यवहार जपून केले पाहिजेत. थोडक्यात सगळ्याच क्षेत्रात डोळसपणे कारवाई केली पाहिजे.
6 / 6
या राशीच्या लोकांवर शनी देवाचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहार प्रामाणिकपणे आणि चोखपणे केला पाहिजे. अन्यथा कोणाची फसवणूक, लबाडी अंगाशी येऊ शकते. अशा गोष्टी शनी देवांना अजिबात प्रिय नाहीत. त्यामुळे सावध पावले उचलावीत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष