By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 16:09 IST
1 / 4ज्योतिष शास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे माणसाच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या समस्या दूर होऊ शकतात. गूळ केवळ आरोग्याच्या दृष्टीकोनातूनच चांगला मानला जात नाही तर त्यासाठी काही ज्योतिषीय उपायही सुचवले आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार गुळाचे हे उपाय एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक, मानसिक, वैवाहिक समस्या दूर करू शकतात.2 / 4जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती प्रभावी नसेल, तर त्यांनी रोज सकाळी उठल्यावर थोडा गूळ खावा आणि नंतर पाणी प्यावे. यासोबत कोणत्याही रविवारपासून नजीकच्या मंदिरात ८०० ग्रॅम गहू आणि ८०० ग्रॅम गूळ अर्पण करावा. हे तुम्हाला सलग ८ दिवस करावे लागेल. यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होऊ शकते.3 / 4जर तुमच्या जीवनात आर्थिक समस्या असतील तर गुळाचा एक छोटा तुकडा घ्या आणि एका नाण्यासह लाल कपड्यात बांधा. पूजेच्या वेळी लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवा आणि त्याची विधिवत पूजा करा. ही पाच दिवस सतत करा आणि पाचव्या दिवशी दुर्गादेवीची पूजा केल्यानंतर हे कापड उचलून आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने धनाची आवक वाढण्याची शक्यता निर्माण होते.4 / 4जर एखाद्या व्यक्तीच्या लग्नात विलंब होत असेल किंवा काही अडथळे येत असतील तर गुळाचा हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यासाठी दर गुरुवारी पिठाच्या गोळामध्ये थोडासा गूळ, तूप आणि हळद टाकून त्याची पोळी गायीला खाऊ घाला. हे तुम्हाला सलग ७ गुरुवार करावे लागेल. यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर दूर करता येईल.