शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Astro Tips: खूप मेहनत घेऊनही यश मिळत नाही? शनिवारी करा 'हे' खास उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 10:39 IST

1 / 5
खूप मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, तेव्हा निराश होणे स्वाभाविक आहे. ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की अनेक वेळा नशीब साथ देत नसल्याने अशा समस्या उद्भवतात, ज्यावर काही खास उपाय करून मात करता येते. असे काही उपाय पुढे देत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही जीवनात यश मिळवू शकता.
2 / 5
मिऱ्यांचा समावेश खड्या मसाल्यांमध्ये केला जातो. आयुर्वेद आणि आहारशास्त्राच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहेच, शिवाय ज्योतिष शास्त्रानेही त्याचे महत्त्व ओळखून त्याचा वापर करून घेतला आहे. काळ्या मिऱ्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या कामाला निघताना ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने मनात काही शंका असतील तर घराच्या प्रमुख दारात पाच-सहा मिरे ठेवा आणि निघताना त्याला पाय टेकवून पुढे जा. काम करून घरी आल्यावर ते मिरे पुडीत बांधून आडवाटेच्या झाडाशी टाकून द्या. तसे केल्याने कामातील अडथळे दूर होतील.
3 / 5
ज्या लोकांच्या कुंडलीत शनि दोष आहे किंवा साडेसातीचा त्रास सुरू आहे त्यांनी यथाशक्ती आर्थिक दान आणि काळी मिरीचे पाकीट शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे किंवा शनि मंदिरात ठेवावे. असे केल्याने कुंडलीतील शनि दोष निघून जातो असे म्हणतात.
4 / 5
एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीने अमावस्येच्या रात्री दहा बारा मिरे छोट्या पुडीत बांधून दक्षिण दिशेला फेकून यावेत. दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते. त्या दिशेने संकटं संपुष्टात यावी यासाठी हा उपाय सांगितला जातो. त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप करावा हेही सांगितले जाते.
5 / 5
आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका पुडीत काळी मिरीचे काही दाणे बांधून ती पुडी पूजा करताना देवासमोर ठेवा आणि पूजा झाली की लक्ष्मी मातेला शरण जाऊन आपली आर्थिक अडचण सांगा व नंतर ती पुडी आपल्या तिजोरीत काही काळ ठेवा. फरक दिसू लागेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष