शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Astro Tips: जुलैमध्ये घसघशीत अप्रेजल हवी? लगेच फॉलो करा 'या' ज्योतिष शास्त्रीय टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 15:46 IST

1 / 6
जून-जुलै येताच नोकरदारांना आस लागते ती पगारवाढीची! कारण हा काळ असतो अप्रेजलचा, अर्थात पगारवाढीचा. या काळात उत्पन्नात म्हणजेच पगारात घसघशीत वाढ व्हावी असे वाटत असेल तर ज्योतिष शास्त्राने दिलेल्या टिप्स फॉलो करा.
2 / 6
ऑफिसमध्ये दिवसभर मेहनत करूनही अपेक्षित पगारवाढ मिळत नाही. मात्र कामाचे प्रेशर वाढत राहते, सहकाऱ्यांचा त्रास, बॉसने दिलेली कामाची डेडलाईन, मान पाठ दुखेपर्यंत केलेले काम, पण मोबदला शून्य; अशी तुमचीही अवस्था असेल तर ज्योतिष शास्त्रात दिलेले उपाय करा.
3 / 6
नोकरीत बढती मिळवण्यासाठी तसेच पगार वाढीसाठी रविवारी गाईला गहू आणि गूळ खाऊ घाला. प्यायला पाणी द्या आणि तिच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्या. हा उपाय सतत ५ ते ७ रविवार करा. ज्योतिषशास्त्रानुसार गोमातेच्या आशीर्वादाने नोकरीत बढती मिळते. तसेच चांगली पगारवाढ होते.
4 / 6
याशिवाय नोकरीत बढती मिळण्यासाठी सोमवारी केलेले उपायही खूप फलदायी ठरतील. या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि एखाद्या गोर गरिबाला तांदुळाचे दान द्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता तेव्हा ही सृष्टी तुम्हाला जे हवे ते देण्यासाठी कटिबद्ध होते.
5 / 6
नोकरी शोधण्यात अपयश येत असेल, तर मुलाखतीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून आंघोळ करा. यानंतर वस्त्र परिधान करून पूजा करा आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप करा व आपली मनोकामना देवाला सांगून मुलाखतीला जा, यश मिळेल.
6 / 6
जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल, तर शनिवारी सकाळी स्नान करून शनिदेवाची पूजा करा. स्नान करताना 'ओम शम शनैश्चराय नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करा. असे केल्याने मनासारखे काम मिळते असाही भाविकांचा अनुभव आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष