Angaraki Chaturthi 2023: २७ वर्षांनी अंगारकीला जुळून आला सर्वार्थसिद्धी योग; तुमच्या राशीला कोणता लाभ? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 17:31 IST
1 / 12मेष राशीचे जातक जन्मतःच शीघ्रकोपी असल्याने त्यांनी रागावर नियंत्रण ठेवले तर अंगारकीच्या दिवशी त्यांना चांगली बातमी मिळू शकते. नवीन कामाची सुरुवात या दिवशी केल्याने सर्वार्थसिद्धी योगाचा उचित लाभ घेऊ शकाल!2 / 12वृषभ राशीसाठी हा दिवस खास असेल. जुनी येणी वसूल होतील. अनेक दिवसांपासून अडलेले काम पूर्णत्त्वास जाईल आणि नवीन क्षेत्राचे दालन खुले होईल. नवीन काम सुरु करणार असाल तर उत्तम मुहूर्त आहे. 3 / 12मिथुन राशीच्या जातकांसाठी हा दिवस आनंदाचा असेल. महत्त्वाच्या कामात घरच्यांचा पाठिंबा मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. अविवेकाने निर्णय घेऊ नका, अन्यथा भविष्यात पश्चात्ताप होईल. 4 / 12कर्क राशीसाठी अंगारकी शुभदायी ठरेल. बाप्पाच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करता आली तर उत्तम. नवीन क्षेत्रात, व्यवसायात किंवा शिक्षणात पाऊल ठेवत असाल तर अंगारकीसारखा दुर्मिळ योग्य नाही. 5 / 12सिंह राशीला अंगारक योग अनुकूल ठरेल. बाप्पाचे नाव घेऊन नवीन कामात, व्यवहारात गुंतवणूक केल्यास लाभदायी ठरेल. नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठीही हा योग उचित ठरेल. खरेदीवर चांगला लाभ संभवतो. 6 / 12कन्येच्या जातकांनी सर्वार्थसिद्धी योगाचा लाभ करून घेण्यासाठी सतर्क राहायला हवे. आलेली संधी ओळखता आली आणि त्या संधीचे सोने करता आले तर संपूर्ण वर्ष आनंदात जाऊ शकेल. 7 / 12तूळ राशीच्या लोकांसाठी हा दिवस थोडा संमिश्र असेल. तब्येतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे. मुलांकडून किंवा नातवांकडून आनंद वार्ता समजेल. बाप्पाच्या दर्शनाने मन प्रसन्न होईल, सकारात्मकता वाढेल. 8 / 12मंगळाचा सकारात्मक प्रभाव पडून वृश्चिक राशीच्या जातकांना अंगारकी इप्सित फळ देणारी ठरेल. अडलेले काम मार्गी लागेल. मोठी संधी चालून येईल आणि तुम्ही त्या संधीचे सोने कराल. 9 / 12साडेसाती संपायच्या उम्बरठ्यावर उभे असलेले धनु राशीचे जातक बाप्पाच्या आशीर्वादाने नवीन क्षेत्रात, व्यवसायात स्वतःला सिद्ध करू पाहतील. सर्वार्थसिद्धी योगाच्या निमित्ताने उपयोगी वस्तूची खरेदी कराल. 10 / 12मकर राशीच्या जातकांनी अंगारकी विशेष अथर्वशीर्षाचे ३,७,९,११,२१ अशा संख्येत पारायण करावे.त्यामुळे मंगळाचे बळ मिळेल. शनिदेव राशीत प्रवेश करण्याआधी पार्श्वभूमी तयार होईल. 11 / 12कुंभ राशीच्या जातकांसाठी हा दिवस विशेष असेल. बाप्पाच्या आशीर्वादाने जुन्या, अडलेल्या कामांना चालना मिळेल. जुनी येणी वसूल होतील. मन शांत राहावे यासाठी गणेश स्तोत्राचे पारायण किंवा गणेशाचा जप करा. 12 / 12मीन राशीच्या लोकांनी अंगारक योगाचा पुरेपूर वापर करून घेत एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे. धनलाभाचे योग आहेत. बाप्पाच्या आशीर्वादाने आवश्यक कामात येणाऱ्या अडचणींवर मात करू शकाल.