म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पाठीवर पिंपल्स त्रासदायक ठरतायत?; 'या' घरगुती उपायांनी करा दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 19:32 IST
1 / 5अनेकांना विविध कारणांमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सचा सामना करावा लागतो. काही लोकांना फक्त चेबऱ्यावरच नाही तर पाठीवरही पिंपल्स येतात. एवढचं नाही तर ते फार मोठे आणि वेदनादायी असतात. असं शरीरातील काही हार्मोन्समुळे होत असतं. जे अधिक सीबम तयार करतात. तुम्हालाही या समस्यांचा सामना करावा लागतो असेल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून सुटाका करून घेऊ शकता. 2 / 5आंघोळ केल्यानंतर कोरफडीचा गर पाठीवर लावा. त्यामुळे पाठवरील चट्टे, डाग आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होते. 3 / 5बेकिंग सोड्यामध्ये गुलाब पाणी आणि मध एकत्र करा. तयार पेस्टच्या मदतीने हलक्या हाताने स्क्रब करा आणि गरम पाण्याने पाठ धुवून स्वच्छ करा. पुढेचे काही तास पाठीवर साबण लावू नका. 10 ते 12 दिवस हा उपाय ट्राय केल्याने पाठीवरील पिंपल्स दूर करण्यासाठी मदत होते.4 / 5तीन चमचे हळद आणि पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट रात्री पाठीवर लावा. सकाळी गरम पाणी आमि मेडिकेटेड साबणाच्या वापराने आंघोळ करा. असं दोन आठवड्यांसाठी केल्यानंतर फायदा होइल. 5 / 5एक चमचा मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी आणि एक चमचा चंदनाची पावडर एकत्र करा. तयार पेस्ट संपूर्ण पाठीवर लावा. साधारणतः अर्ध्या तासासाठी तसचं ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करा. उन्हाळ्यामध्ये हा पॅक दर दोन दिवसांनी लावा.