तुमची कार चांगल्या किंमतीला विकायचीय? थोडे जास्तच पैसे येतील, ही अफलातून ट्रिक वापरा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 13:01 IST
1 / 8तुमची कार जुनी झाली असेल, एखादी नवीन कार मनात भरली असेल तर तुम्हाला जुन्या कारची चांगली किंमत येण्यासाठी काय करावे लागेल? आम्ही काही टिप्स देत आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमची कार चांगल्या किंमतीत विकण्यास मदत होईल.2 / 8पहिली गोष्ट, कार ऑनलाईन बाजारात मुळीच विकू नका. परंतू, त्यांना कारचे इन्स्पेक्शन करण्यासाठी जरूर बोलवा. यामुळे तुम्हाला तुमच्या कारमध्ये काय खराबी आहे, काय नाहीय ते समजेल. शिवाय ते किती किंमतीला विकत घेतील हे देखील समजेल. 3 / 8दुसरी गोष्ट, ऑनलाईन कंपन्यांच्या अॅपवर तुमच्या कारचे मॉडेल, वर्ष आदी टाकून ते कितीला विकतायत ते पहा. तुम्हाला ऑफर केलेली किंमत आणि ते विकत असलेली किंमत ही बऱ्याचदा दोन ते पाच लाखांच्या फरकाने असते. म्हणजेच हप्ते तुम्ही भरले, कारचा मेन्टेनन्स तुम्ही केला. कारची काळजी तुम्ही घेतली आणि तुम्हाला दोन लाख मिळणार, परंतू त्या कंपन्यांना तुमच्या दुप्पट मिळणार, असे कसे... याचाही विचार करा.4 / 8यामुळे तुम्ही तुमची कार विकण्याचा प्रयत्न करा. वापरलेल्या वस्तू विकण्याचे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म, फेसबुक, इन्स्टा आदींवरील काही पेजेस असे अनेक मार्ग आहेत. तुम्हाला काहींचे फोन येतील. त्यांच्याशी बार्गेन करा, मग ऑनलाईन कंपन्यांनी सांगितलेल्या किंमतीपेक्षा जरा जास्तीच पैसे तुमच्या हाती येतील की नाही ते बघा...5 / 8कारची चांगली किंमत येण्यासाठी कार तुम्हाला टकाटक ठेवावी लागेल. तिची वेळोवेळी सर्व्हिसिंग केलेली असावी. याची कागदपत्रे असावीत. विकण्यापूर्वी सर्विसिंग करावी म्हणजे सर्व छोट्या मोठ्या गोष्टी दुरुस्त होतील. गिअर, क्लच, स्टिअरिंग, आवाज आदी गोष्टी तपासाव्यात व दुरुस्त कराव्यात. 6 / 8एखाद्याने पाहताच त्याला ती कार पसंत पडायला हवी. यामुळे गाडीवरील छोटे मोठे स्क्रॅच, पोंग आदी दुरुस्त करून घ्यावे. विकत घेतल्यानंतर काम करायचे असल्यास लोक नाक मुरडतात आणि तुमची कार विकली जात नाही किंवा कमी किंमतीत मागतात. 7 / 8गाडीचे इंटेरिअर देखील चकाचक करावे लागेल. जेव्हा गाडीमध्ये पहायला आलेला व्यक्ती बसेल तेव्हा त्याला असे वाटता नये की खूपच घाण वापरलेली आहे किंवा कशीतरीच ठेवलेली आहे. यामुळे नेहमी तुम्ही वापरत नसाल तरी तो येण्यापूर्वी फरफ्युम, स्प्रे आदी मारावा. म्हणजे आतील वातावरण त्याला चांगले वाटेल. 8 / 8कारवर लोन असेल, तर ते किती दिवसांत क्लिअर होईल, हे बँकेला विचारा. गिऱ्हाईकाने पैसे दिले तर ते भरल्यानंतर किती दिवसांत एनओसी मिळेल, गिऱ्हाईकाला ती कशी पोहोच करता येईल आदींची विचारणा आणि बोलणी करा.