शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Toyota Hyryder CNG: देशातील पहिल्या CNG SUV ची बुकिंग सुरू, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 1:38 PM

1 / 6
Toyota Hyryder CNG: टोयोटा किर्लोस्कर मोटर लवकरच बाजारात त्यांच्या प्रसिद्ध मिड साइज Hyryder SUV चे CNG व्हर्जन लॉन्च करणार आहे. कंपनीने अधिकृतपणे या एसयूव्हीची बुकिंग सुरू केली आहे. कंपनी फिटेट CNG किट असलेली ही देशातील पहिली SUV असेल.
2 / 6
कंपनीने रेग्लुयर पेट्रोल आणि हायब्रिड इंजिनसह येणारी SUV यावर्षीच बाजारात आणली होती. याची किंमत रु. 10.48 लाख ते रु. 18.99 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. नवीन CNG मॉडेलची किंमत जास्त असण्याची अपेक्षा आहे. पण, या गाडीकडून अधिक मायलेजची अपेक्षा केली जाऊ शकते.
3 / 6
नवीन CNG व्हेरिएंट लाँच झाल्यानंतरच गाडीची खरी किंमत कळेल. टोयोटा मोटर कॉर्पोरेशन आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने संयुक्तपणे Hyryder विकसित केली आहे. मारुती सुझुकीने अलीकडेच या एसयूव्हीवर आधारित त्यांची ग्रँड विटारा लॉन्च केली आहे. टोयोटाची ही एसयूव्ही स्ट्राँग हायब्रिड आणि माइल्ड हायब्रिड इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.
4 / 6
कंपनीचा दावा आहे की, त्यांचे स्ट्राँग हायब्रिड व्हर्जन 27.97 kmpl, माइल्ड हायब्रिड (मॅन्युअल) व्हर्जन 21.12 kmpl आणि ऑटोमॅटिक व्हर्जन 19.39 kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. कंपनीने त्यांच्या CNG व्हर्जनमध्ये 1.5-लीटर के-सिरीज इंजिन वापरेल आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडले जाईल. CNG मॉडेल 26.1 किमी/किलो मायलेज देण्याचा दावा आहे.
5 / 6
सध्या ही SUV एकूण चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, तर त्याचे CNG मॉडेल एकूण दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. किमतीत हे नियमित पेट्रोल मॉडेलपेक्षा 1 लाख रुपयांपर्यंत महाग असू शकते. लवकरच या SUVची खरी किंमत उघड होईल. कंपनीने फिट केलेले CNG किट व्यतिरिक्त, या एसयूव्हीच्या बाह्य किंवा आतील भागात कोणतेही बदल अपेक्षित नाहीत.
6 / 6
सध्याच्या Toyota Hyryderला एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, ट्विन एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, 17-इंच अलॉय व्हील, एलईडी टेललाइट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, टेलिस्कोपिक स्टीयरिंग, 9-इंच स्मार्ट प्लेकास्ट टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट आणि 360 डिग्री कॅमेरा मिळेल. कंपनी सीएनजी व्हेरियंटमध्येही हे सर्व फीचर्स देणार आहे.
टॅग्स :ToyotaटोयोटाAutomobileवाहन