Top 4 Cheap Bikes: iPhone च्या किंमतीत मिळतायत ‘या’ चार बाईक्स, मायलेजही १०० किमीपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 17:03 IST
1 / 6सध्या आयफोनचे सुरुवातीचे मॉडेल आयफोन एसई आहे, ज्याची एमआरपी 49900 रुपये आहे. म्हणजेच ढोबळमानाने 50 हजार रुपये मानता येतील. त्याच वेळी, आयफोनचे टॉप मॉडेल आयफोन 14 प्रो मॅक्स आहे.2 / 6याची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत पाहिले तर या किमतीत अनेक बाइक्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. म्हणूनच, आम्ही तुम्हाला अशाच काही मोटारसायकल्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची सुरुवातीची किंमत सुमारे 60,000 रुपयांपासून सुरू होते. या मोटारसायकल्स मायलेजदेखील खूप चांगले देतात.3 / 6TVS Sport ची सुरुवातीची किंमत 64 हजार रुपये आहे, जी 68 हजार रुपयांपर्यंत जाते. यात 109cc इंजिन आहे. हे 8.18bhp कमाल पॉवर जनरेट करते. ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींपैकी एक आहे. त्याच्या देखभालीचा खर्च खूपच कमी आहे. TVS वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या काही रिव्ह्यूजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की बाइक 110km पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.4 / 6Hero HF DELUXE ची सुरुवातीची किंमत 60,308 रुपये आहे, जी 65,938 रुपयांपर्यंत जाते. कंपनीच्या वेबसाइटवर एका ग्राहकाचा हवाला देत लिहिले आहे की, ही बाईक 100km पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. बाईकमध्ये 97.2cc इंजिन आहे. हे 5.9kw पॉवर आणि 8.5Nm टॉर्क जनरेट करते.5 / 6बजाज प्लॅटिना 100 ची सुरुवातीची किंमत 64653 रुपये आहे. बाईकमध्ये 102cc 4 स्ट्रोक, DTS-i, सिंगल सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 5.8 kW कमाल पॉवर आणि 8.3 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 4-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. बाईकचे मायलेज 70KM पेक्षा जास्त आहे. टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे.6 / 6बजाज CT110X ची किंमत रु.59,104 पासून सुरू होते. यात 115.45cc 4 स्ट्रोक, सिंगल सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8.6 पीएस कमाल पॉवर आणि 9.81 Nm पीक टॉर्क देते. हे 4-स्पीड गिअरबॉक्ससह येते. त्याचे मायलेज 70 किमी पेक्षा जास्त आहे.