By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 17:48 IST
1 / 5कमबॅक: बजाज ऑटोने आपली लोकप्रिय बाईक 'पल्सर १८०' तब्बल ४ वर्षांनंतर भारतीय बाजारपेठेत पुन्हा लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक २०२२ मध्ये बंद केली होती. मात्,र वाढती मागणी लक्षात घेता ती २०२६ मध्ये नव्या अवतारात परतली आहे.2 / 5किंमत: या नवीन पल्सर १८० ची सुरुवातीची किंमत १.२२ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली असून, सध्या ती एकाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.3 / 5इंजिन आणि परफॉर्मन्स: यात १७८.६१ सीसीचे शक्तिशाली इंजिन दिले आहे, जे १६.७७ bhp पॉवर आणि १५ Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन दैनंदिन वापरासाठी आणि हायवे रायडिंगसाठी अत्यंत कार्यक्षम मानले जाते.4 / 5नवे फीचर्स: नव्या मॉडेलमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे हॅलोजन ऐवजी आता 'एलईडी हेडलाईट' (LED Headlight) देण्यात आली आहे. यासोबतच एलईडी इंडिकेटर्स आणि नवीन एलईडी डिस्प्ले देखील जोडण्यात आला आहे.5 / 5डिझाइन आणि लूक: बाईकचा मूळ मस्क्युलर लूक कायम ठेवला असला तरी, यात नवीन ब्लॅक कलर आणि स्पोर्टी ग्राफिक्सचा वापर केला आहे. तसेच फ्रंट मडगार्डवर कार्बन फायबर फिनिश देऊन तिला अधिक प्रीमियम लूक देण्यात आला आहे.