अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 14:05 IST
1 / 7 Tesla Launching in India: इलॉन मस्क यांच्या नेतृत्वातील Tesla चे भारतात अधिकृत शोरुम आजपासून सुरू झाले असून, आपली पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही Y RWD लॉन्च केली आहे. मुंबईतील टेस्लाच्या शोरुममध्ये याची अधिकृत विक्री सुरू आहे. 2 / 7 टेस्लाने भारतात या कारची ऑन-रोड किंमत ६१.०७ लाख रुपये ठेवली आहे. तर, टॉप मॉडेलची किंमत ६९.१५ लाख रुपये आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही दिल्ली, गुरुग्राम आणि मुंबई या तीन प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध असेल. कंपनी २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीपासून याची डिलिव्हरी सुरू करेल.3 / 7 भारतात इतकी जास्त किंमत का? अमेरिकेत ही कार $४४,९९० (सुमारे ३८ लाख रुपये) मध्ये उपलब्ध आहे, तर भारतात याची किंमत इतकी जास्त का आहे? यामागील पहिले कारण आयात शुल्क आहे. 4 / 7 भारतात संपूर्ण परदेशी बनावटीच्या कारवर ७० टक्क्यांपर्यंत कर आकारला जातो. दुसरे कारण म्हणजे, तिचा लॉजिस्टिक्स खर्च, जो चीनमधील शांघाय प्लांटमधून मुंबईत आणण्यासाठी लागतो. याशिवाय, वाहतूक आणि कस्टम्समध्ये मोठा खर्च येतो.5 / 7 टेस्ला मॉडेल Y दोन प्रकारांमध्ये (स्टँडर्ड RWD आणि लॉन्ग रेंज RWD) लॉन्च झाली आहे. या प्रकारात 60kWh LFP बॅटरी असेल, जी सुमारे 500 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल. तसेच, ही कार सुमारे 5.6 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकेल. 6 / 7 तर, लॉन्ग रेंज RWD प्रकारात 75kWh NMC बॅटरी असेल, ज्याची रेंज 622 किलोमीटरपर्यंत आहे. ही SUV 5 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठू शकेल.7 / 7 टेस्ला मॉडेल Y भारतात अनेक प्रगत तांत्रिक वैशिष्ट्यांसह लॉन्च केली जाईल. यात ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपडेट्स, मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन, इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल सीट दिले जाऊ शकतात. यासोबतच, टेस्ला अॅपद्वारे टेस्लाची प्रीमियम साउंड सिस्टम आणि रिअल-टाइम कंट्रोल प्रदान केले जाईल.