Tata Punch ची धमाल! पहिल्याच महिन्यात ठरली कंपनीची बेस्ट कार; किती झाली विक्री? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 19:57 IST
1 / 9Tata मोटर्सच्या Tata Punch या बहुचर्चित मायक्रो एसयूव्ही कारने पहिल्याच महिन्यात धमाका केला आहे. ही छोटी एसयूव्ही विक्रीच्या बाबतीत कंपनीची पहिल्या क्रमांकाची कार ठरली आहे. 2 / 9Tata Punch ने पहिल्याच महिन्यात Tiago, Altroz, Nexon ला मागे टाकले आहे, यासह ती देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्येही १० व्या स्थानावर आली. टाटा पंचने पहिल्याच महिन्यात शानदार, दमदार कामगिरी केली आहे. 3 / 9Tata मोटर्सने पहिल्याच महिन्यात ८ हजार ४५३ टाटा पंच कारची विक्री केली. टाटा पंच कारच्या या धमाल कामगिरीमुळे टाटा मोटर्स विक्रीच्या बाबतीत कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. ऑक्टोबरमध्ये कंपनीच्या विक्रीत ४४ टक्के वाढ झाली आहे. 4 / 9Tata मोटर्सचा बाजारातील हिस्सा १३.७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ही छोटी एसयूव्ही १८ ऑक्टोबर रोजी लाँच झाली आणि फक्त १२ दिवसात तिची चांगली विक्री झाली आहे. याशिवाय टाटा पंचची विक्री या महिन्यात आणखी चांगली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 5 / 9Tata मोटर्सच्या Tata Punch या मायक्रो एसयूव्हीला किती बुकिंग मिळाले हे कंपनीने अद्याप उघड केले नसले, तरी सुरुवातीच्या बुकिंगसाठी पुरेसे मॉडल्स स्टॉकमध्ये असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीने थोड्या दिवसांतच बंपर डिलिव्हरी केली आहे.6 / 9Tata Punch ला कंपनीने ५.४९ लाख ते ९.०९ लाख रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात सादर केले असून, कंपनीच्या लाइनअपमध्ये Tiago आणि Nexon दरम्यान ठेवले आहे. तसेच टाटा पंच कार Pure, Adventure, Accomplished आणि Creative अशा एकूण चार ट्रिममध्ये लाँच करण्यात आली आहे. 7 / 9Tata Punch ची परवडणारी किंमत, लेटेस्ट आणि सेगमेंट फर्स्ट फीचर्स, आकर्षक डिझाईन आणि देशातील सर्वात सुरक्षित कार म्हणून ग्राहकांनी या कारला जबरदस्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. 8 / 9Tata Punch मध्ये ७ इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, आयआरए कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, २७ कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीनेही ही शानदार असून सेफ्टीमध्ये ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. टाटा पंच ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते.9 / 9Tata Punch मध्ये ७ इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, आयआरए कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, २७ कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीनेही ही शानदार असून सेफ्टीमध्ये ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. टाटा पंच ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते.