टाटा मोटर्सने सादर केली नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार 'Curvv', जाणून घ्या फीचर्स कसे असतील?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 15:00 IST
1 / 6टाटा मोटर्सने आपल्या आगामी सर्व-इलेक्ट्रिक कारची कॉन्सेप्ट सादर केली आहे. कंपनीची ही पहिली कार आहे, ज्यामध्ये डिझेल किंवा पेट्रोल व्हेरिएंट नाही. हे पहिल्यांदा फक्त इलेक्ट्रिकसह येणार आहे.2 / 6टाटा मोटर्सच्या कॉन्सेप्टच्या Curvv EV च्या केबिनमध्ये ट्विन ऑल-डिजिटल डिस्प्ले स्क्रीन, फॅब्रिक-फिनिश डॅशबोर्ड, पॅनोरामिक सनरूफ, इल्यूमिनेटेड लोगो आणि बरेच काही आहे. हे सध्याच्या कोणत्याही टाटा ईव्हीपेक्षा चांगले कार्यप्रदर्शन देईल, ज्याची मॅक्सिमम रेंज 500 किमी असू शकते.3 / 6Curvv EV च्या रिअर आणि फ्रंट प्रोफाइलवर उंच एलईडी लाइट्स आहेत. एसयूव्ही बॉडी शेपमध्ये मोठे व्हील आर्च, हाय ग्राउंड क्लीअरेंस आणि कूप यासारख्या रुफलाइनसोबत कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक व्हेइकलची रस्त्यावर उपस्थिती असण्याची शक्यता आहे.4 / 6Curvv EV नेक्सॉनच्या वर ठेवली जाईल, ज्यामुळे ती टाटा मोटार्सच्या ईव्ही पोर्टफोलिओमधील पहिली मिड-साइज इलेक्ट्रिक एसयुव्ही असेल. प्रॉडक्शन व्हर्जन 2024 मध्ये लॉन्च होणार आहे. मात्र, टाटा मोटर्सने याबाबत अद्याप सांगितले नाही. कार Curvv EV कदाचित टाटा मोटर्सच्या मॉड्यूलर ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.5 / 6टाटा मोटर्स सांगत आहे की, Curvv कॉन्सेप्टमध्ये व्हीकल-टू-व्हीकल आणि व्हीकल-टू-लोड चार्जिंग कॅपेबलिटी असेल. याचा अर्थ हे इतर वाहने किंवा लहान विद्युत उपकरणे चार्ज करू शकतात.6 / 6 टाटा मोटरच्या जनरेशन 2 पोर्टफोलिओमधील सर्व मॉडेल्स अनेक स्तरांवर रीजनरेटिव्ह ब्रेकिंगसह येतील. ते युजर्सना रीजनरेटिव्ह ब्रेकिंग पूर्णपणे बंद करण्याची क्षमता देखील देतील. याशिवाय रिजन ब्रेकिंग सिस्टिममध्येही सुधारणा करण्यात येणार आहे.