Tata Nexon वर भन्नाट ऑफर! केवळ १ लाख भरा अन् कार घरी घेऊन जा; पाहा, डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 14:09 IST
1 / 12TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्या आताच्या घडीला दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. केवळ भारतीय बाजारपेठेत नाही, तर शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. कोरोना संकट कालावधीत भारतीयांचा टाटांवरील विश्वास अनेक पटीने वाढल्याचे सांगितले जात आहे. 2 / 12TATA ग्रुपमधील Tata Motors कंपनी लागोपाठ आपली नवीन उत्पादने लाँच करत आहे. टाटा मोटर्सचा भारतीय बाजारातील वाहन विक्रीतील शेअर कमालीचा वाढला असून, गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यांत टाटा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली होती. याशिवाय टाटाच्या अनेक कार टॉप १० मध्ये झळकत आहेत. इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटाचा दबदबा कायम आहे. 3 / 12Tata Motors सर्वाधिक लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणात खप होणारी कार म्हणजे Tata Nexon. ही कार इलेक्ट्रिक पर्यायतही उपलब्ध असून, लवकरच सीएनजीमध्ये भारतीय बाजारात दिसू शकते, असे सांगितले जात आहे. एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये Tata Nexon ने विक्रीच्या बाबतीत मोठी आघाडी घेतली आहे. 4 / 12Tata Nexon ही कार सेफ्टी फीचर्ससाठी आणि 5-स्टार GNCAP रेटिंगसाठी ओळखली जाते. देशातील टॉप 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी ही एक आहे. कारचे EV व्हेरियंट देखील भारतात खूप लोकप्रिय झाले आहे. 5 / 12Tata Nexon कारचा लूक, किंमत, मायलेज यांमुळे कार प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. ही मोस्ट डिमांडिंग कार केवळ १ लाख रुपये डाउन पेमेंट देवून तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. टाटा नेक्सॉन या एसयूव्ही मध्ये कंपनीने १.५ लीटरच्या क्षमतेचे टर्बो चार्ज डिझेल इंजिन आणि १.२ लीटरच्या क्षमतेचे टर्बो चार्ज पेट्रोल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. 6 / 12Tata Nexon या एसयूव्हीमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS),ऑटो AC, टायर प्रेशन मॉनिटरिंग, क्रूज कंट्रोल, डुअल फ्रंट एयरबॅग, रियर पार्किंग सेंसर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, चाइल्ड सीट ISOFIX, स्पीड अलर्ट सिस्टम यांसारखे खास फीचर्स दिले आहेत. 7 / 12जर तुम्हाला ही कार ईएमआयवर खरेदी करायची असेल तसेच तुम्ही या कारला खरेदी करताना १ लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर Tata Nexon XE पेट्रोल कारला ईएमआय कॅलक्यूलेटरच्या हिशोबानुसार, ९.८ टक्के बँक लोन या प्रमाणे ५ वर्षासाठी या कारचा ईएमआय १५ हजार ८२७ रुपये प्रति महिना होईल. 8 / 12यासोबतच फायनान्स केल्यास तुम्हाला ५ वर्षासाठी जवळपास २ लाख १ हजार २५२ रुपये व्याज द्यावे लागेल. दरम्यान, नेक्स्ट जनरेशन Tata Nexon चे एक नवीन इलस्ट्रेशन ऑनलाइन समोर आले आहे. टाटा नेक्सॉन फेसलिफ्टच्या डिझाईनचा अंदाज यातून लावला जाऊ शकतो. 9 / 12नवीन रेंडर टाटा नेक्सॉनच्या डिझाइनला आकर्षक स्वरूप देते. यामध्ये नव्या टाटा लोगोसह एक स्टायलिश नवं फ्रन्ट फेसिया आहे. मागील पॅनलला समोरच्या प्रमाणेच डिझाइनसह स्टाइलिश टेललाइट्स देखील मिळतात. 10 / 12यामध्ये बेसिक फीचर्स सेमच आहेत. कारचे डिझाईन खूपच फ्युचरिस्टिकदेखील आहे. नवीन रेंडर ग्रीन आणि ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. या कारमध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत जे इतर मॉडेल्सपेक्षा या कारला चांगले बनवतात. 11 / 12Tata Nexon मध्ये 7 इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे, जी अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला कनेक्ट येते. या व्यतिरिक्त, डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी फंक्शनल स्टियरिंग व्हील यांसारखे एकापेक्षा एक फीचर्स येतात.12 / 12Tata Nexon एसयुव्हीच्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत ७.२८ लाख रूपयांपासून ११.८९ लाख रूपयांच्या दरम्यान आहे. तर डिझेल व्हेरिअंटची किंमत ९.४८ लाख रूपयांपासून १३.२३ लाख रुपयांपर्यंत आहे. सध्या कंपनीने या एसयुव्हीच्या डार्क एडिशन्सदेखील लाँच केल्या आहेत.