Tata Motors: टाटा मोटर्सच्या गाड्या पुन्हा महागल्या; पाहा किती झाली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 09:43 IST
1 / 12Tata Motors Hikes Prices of Passenger Vehicles : देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सनं (TATA Motors) आपल्या कार्सच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. भारतीय बाजारपेठेत सादर करण्याच आलेल्या सर्व प्रवासी वाहनांच्या किंमतीत कंपनी काही प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 / 12टाटा मोटर्सच्या या वाढलेल्यावाहनांच्या किंमती मंगळवार ३ ऑगस्टपासून लागू करण्यात आल्या आहेत. परंतु या दरवाढीमागे कोणतं अधिकृत कारण सांगण्यात आलं नाही. परंतु कारसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याचं काही दिवसांपूर्वी कंपनीनं सांगितलं होतं. 3 / 12दरम्यान, ३१ ऑगस्टपर्यंत कार बूक करणाऱ्या ग्राहकांना ही दरवाढ लागू होणार नाही. ३१ ऑगस्ट पर्यंत सर्व ग्राहकांना रिटेल प्राईजवर प्रोटेक्शन मिळणार आहे.4 / 12टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांमध्ये सरासरी ०.८ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. प्रत्येक मॉडेलच्या हिशोबानं किंमतींमध्ये निरनिराळे बदल करण्यात आली आहे. 5 / 12कंपनीच्या न्यू फॉरएव्हर मॉडेलची बुकींग ३१ ऑगस्ट किंवा त्यापूर्वी केली जाईल, त्यांना कोणत्या ही प्रकारची दवाढ लागू केली जाणार नसल्याचं टाटा मोटर्सनं स्पष्ट केलं आहे. टाटा मोटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये टियागो, टिगोर, नेक्सन, अल्ट्रोज, हॅरिअरसारखे मॉडेल्स येतात. 6 / 12टाटा मोटर्सनं यावर्षी तिसऱ्यांदा आपल्या कार्सच्या किंमतीत वाढ केली आहे. जानेवारी महिन्यात कंपनीनं Tiago, Tigor, Nexon, Nexon EV आणि Harrier सारख्या कार्सच्या किंमतीत वाढ केली होती. यानंतर कंपनीनं पुन्हा एकदा मे महिन्यात कार्सच्या किंमतीत वाढ केली होती. 7 / 12दरम्यान, वाहनांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यानं कंपनीनं आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या असून त्याचा फार कमी भागाचा बोजा ग्राहकांवर टाकल्याची माहिती टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिटचे प्रेसिडेंट शैलेश चंद्रा यांनी सांगितलं. 8 / 12उत्पादनासाठी होणाऱ्या अधिक खर्च कमी करण्यासाठी आम्ही अन्य काही उपाय यापूर्वीच केले. जेणेकरून ग्राहकांवर याचा अधिक बोजा पडणार नाही. परंतु कमोडिटीच्या वाढत्या किंमतींमुळे दोन्हीतील दरी वाढत आहे. त्यामुळेच नाईलाजानं आम्हाला किंमती वाढवाव्या लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. 9 / 12'गेल्या वर्षभरात स्टील आणि अन्य धातूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात कमोडिटी किंमतींमध्ये वाढ झाल्यानं आमच्या महसूलावर ८ ते ८.५ टक्क्यांपर्यंत परिणाम झाला आहे,' असंही चंद्रा म्हणाले. 10 / 12टाटा मोटर्सशिवाय अन्य कंपन्यांनीही आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. काही उत्पादकांनी ऑगस्ट महिन्यापासूनच वाढ होणार असल्याची घोषणा केली.यामध्ये होंडा कार्स इंडिया आणि टोयोटाचादेखील समावेश आहे.11 / 12यापूर्वी जुलै महिन्यात मारूती सुझुकीनं आपल्या अनेक कार्सच्या किंमतीत १३,५०० रूपयांपर्यंत वाढ केली होती. यापूर्वी याच वर्षी मे महिन्यात टाटा मोटर्सनं आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमतीत १.८ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. 12 / 12तर दुसरीकडे टाटा मोटर्सनं जानेवारी महिन्यात आपल्या कार्सच्या किंमतीत २६ हजार रूपयांपर्यंतची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीनं वर्षभरात केलेली ही तिसरी दरवाढ आहे.