जबरदस्त! आता Royal Enfield आणतेय इलेक्ट्रिक बुलेट; भन्नाट फिचर्स, दमदार रेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:51 IST
1 / 9भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक सेगमेंट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. आताच्या घडीलाही अनेकविध कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर, मोटरसायकल सादर करताना पाहायला मिळत आहेत. 2 / 9Hero Motocorp, Ather आणि BMW सारख्या टू-व्हिलर उत्पादक कंपन्या येत्या काही महिन्यांत त्यांच्या ईव्ही लाँच करणार आहेत. आताच्या घडीला भारतात TVS, Bajaj यांसह अनेक कंपन्यांच्या स्कूटर आणि मोटरसायकलची डिमांड वाढताना दिसत आहे. 3 / 9यातच आता बुलेट निर्माता कंपनी Royal Enfield आपली इलेक्ट्रिक बाइक लाँच करण्याच्या तयारीत आहे. भारतीय बाजारपेठ, उत्पादन आणि जागतिक बाइक मार्केटनुसार इलेक्ट्रिक बाइक्सची श्रेणी आणि वैशिष्ट्ये यावर चर्चा केली जात आहे, असे रॉयल एनफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांनी म्हटले आहे.4 / 9ऑगस्ट २०२२ मध्ये, रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद दासारी यांनी यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला होता. Royal Enfield ही बाईक २०२३ मध्ये कधीही लाँच केली जाईल. यासाठी कंपनीने यूकेमध्ये रिसर्च सुरू आहे. या बाइकची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असून ती पुढील वर्षी लाँच केली जाऊ शकते.5 / 9Royal Enfield कंपनीने रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाइकचा प्रोटोटाइप आधीच तयार केला आहे आणि लवकरच इव्हीचे उत्पादन सुरू करेल. रॉयल एनफिल्डने उत्पादित केलेली इलेक्ट्रिक बाइक नवीन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची अपेक्षा आहे आणि ती अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल.6 / 9Royal Enfield कंपनी नवीन इलेक्ट्रिक बाइक ८ किलोवॅट ते १० किलोवॅट पर्यंतचा बॅटरी पॅक वापरू शकते आणि ती इलेक्ट्रिक मोटरशी जोडली जाईल. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील सध्याच्या ट्रेंडनुसार, बाइकची पॉवर आणि पीक टॉर्क सुमारे ४० बीपीएच आणि १०० एनएम असणे अपेक्षित आहे. 7 / 9Royal Enfield च्या नवीन इलेक्ट्रिक बाइकच्या डिझाईन आणि फीचर्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी बुलेट मॉडेलसारखे असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. 8 / 9आताच्या घडीला इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये टीव्हीएस आयक्यूब आणि बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय एथर आणि अन्य कंपन्यानी जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न करीत आहेत.9 / 9Royal Enfield नवीन इलेक्ट्रिक बाइक कशी असेल, याबाबतची उत्सुकता वाढली असून, बुलेटप्रेमी ग्राहकांचा या बाइकला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.