बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:21 IST
1 / 8Renault Triber Facelift Price & Features: फ्रेंच कार मेकर Renault ने आज भारतीय बाजारात आपली सर्वात स्वस्त ७-सीटर कार 'रेनॉल्ट ट्रायबर' चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. या कॉम्पॅक्ट एमपीव्हीला जवळजवळ ६ वर्षांनी मोठे अपडेट मिळाले आहे. यापूर्वी, ही कार किरकोळ अपडेटसह लॉन्च करण्यात आली होती. आकर्षक लूक आणि आधुनिक फिचर्सने सुसज्ज असलेल्या नवीन ट्रायबरची किंमत ६.२९ लाख ते ८.६४ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.2 / 8कंपनीने या कारचे ४ व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. त्याच्या बेस व्हेरियंट 'ऑथेंटिक'ची किंमत ६.२९ लाख रुपये आहे. यामध्ये बेसिक फिचर्स देण्यात आली आहेत. दुसरा व्हेरिएंट 'इव्होल्यूशन'ची किंमत ७.२४ लाख रुपये आहे, तर मिड व्हेरियंट 'टेक्नो'ची किंमत ७.९९ लाख रुपये आहे. याशिवाय, टॉप व्हेरियंट 'इमोशन'ची किंमत ८.६४ लाख रुपये आहे. 3 / 8नवीन अपडेट्स आणि फीचर्समध्ये केलेल्या बदलांनंतर, कारच्या किमतीत थोडीशी वाढ झाली आहे. मागील मॉडेल ६.१५ लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंट .९८ लाख रुपयांपर्यंत जाते. म्हणजेच, व्हेरिएंटनुसार त्याची किंमत १४,००० रुपयांवरून ४१,००० रुपयांपर्यंत वाढली आहे. रेनॉल्टच्या नवीन ट्रायबरमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल आणि नवीन फिचर्स जोडली आहेत, जी विशेषतः कोणत्याही फेसलिफ्ट मॉडेलमध्ये दिसून येतात.4 / 8डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, रेनॉल्ट ट्रायबर फेसलिफ्ट त्याच्या मागील मॉडेलच्या तुलनेत पूर्णपणे नवीन डिझाइनसह येते. त्यात एक नवीन फ्रंट फेस आहे, जो नवीन कॉम्पोनन्ट दर्शवितो. हेडलाइट्ससाठी नवीन डिझाइन आणि त्याच युनिटमध्ये बसवलेले एलईडी डीआरएल हे अधिक आकर्षक बनवतात. कंपनीने ही कार पूर्णपणे नवीन लोगो आणि नवीन फ्रंट ग्रिलसह सादर केली आहे. 5 / 8जर तुम्ही साइड प्रोफाइल पाहिले तर, क्रोमऐवजी नवीन डिझाइन केलेले १५-इंच अलॉय व्हील्स आणि ग्लॉस ब्लॅक डोअर हँडल आहेत. मागील बाजूस, स्मोक्ड एलईडी टेल-लाइट्ससह एक नवीन ब्लॅक-आउट ट्रिम जोडण्यात आली आहे. यात 'ट्रायबर' लेटरिंगऐवजी एक नवीन रेनॉल्ट डायमंड मोटिफदेखील आहे, जो आता टेलगेटच्या तळाशी बसवला गेला आहे.6 / 8कंपनीने नवीन ट्रायबरमध्ये पूर्णपणे नवीन केबिन अनुभव देण्यासाठी अनेक बदल केले आहेत. ब्रँडने या कारमध्ये नवीन लेआउटसह स्टीअरिंग व्हील आणि नवीन लोगो सादर करत आहे. केबिनमध्ये ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते.7 / 8इतर फिचर्समध्ये क्रूझ कंट्रोल, ऑटो वायपर, ऑटो हेडलॅम्प, ऑटो फोल्ड आउट साइड रियर व्ह्यू मिरर (ORVM) आणि बरेच काही आहे. सुरक्षा वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), फ्रंट पार्किंग सेन्सर्स आहे. हे सर्व फिचर्स चारही प्रकारांमध्ये उपलब्ध असतील.8 / 8 अपेक्षेप्रमाणे कंपनीने या कारच्या इंजिन यंत्रणेत कोणताही बदल केलेला नाही. या कारमध्ये पूर्वीसारखे 1-लिटर, 3-सिलेंडर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 72 hp पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करते. हेच इंजिन Kiger SUV मध्ये देखील उपलब्ध आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) सह जोडलेले आहे.