By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 19:38 IST
1 / 3ह्युंदाईला भारतात मोठे यश मिळवून देणारी सँट्रो कारच्या नव्या रुपाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. येत्या 26 ऑक्टोबरला ही नवी कार लाँच होणार असून त्या आधीच या कारचे फोटो लीक झाले आहेत. बाहेरील बाजुला मोठा बंपर ग्रील दिसत आहे. फॉग लँप अगदी हेडलाईटच्या खाली देण्यात आले आहेत. 2 / 3या कारमध्ये आतील भागात टच स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच मॅन्युअल एसी आणि ड्युअल टोन मधील डॅशबोर्ड दिसत आहे. 3 / 3पाठीमागील बाजुने ही कार काहीशी सेलेरिओसारखी दिसत आहे.