ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आता तुमच्या कारचे तुम्हीच मायलेज काढा; ही सोपी ट्रिक वापरा, टिप्स फॉलो करा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 13:57 IST
1 / 9देशात पेट्रोल, डिझेलचे दर काही कमी होण्याचे नाव घेत नाहीएत. त्यातच कंपन्या विकताना सांगतात एक आणि प्रत्यक्षात चालविताना कार मायलेज देतेय भलतेच अशी स्थिती आहे. त्यावर कडी म्हणजे पेट्रोल पंपांवर भेसळ, मापात पाप होण्याचे प्रकारही घडत असतात. यामुळे तुमच्या वाहनाचे मायलेज कसे काढायचे? दरवेळी वेगवेगळे येते... 2 / 9सध्याच्या हायटेक गाड्यांमध्ये समोरील स्क्रीनवर देखील मायलेज दाखविले जाते. अनेकदा ते तेव्हा तेव्हाच्या धावत असलेल्या कंडिशनवर असते. मग रेंजही अनेकदा फसविते. दाखवते ६०० आणि कार चालते ३५०-४०० किमी. आपले कुठे चुकते? कारण आपण त्या कारच्या रेंजवर आणि डिस्प्लेवर अवलंबून राहतो. मग अॅक्युरेट मायलेज कसे काढायचे...3 / 9एका सोप्या पद्धतीने तुम्ही कारचे किंवा स्कूटरचे मायलेज काढू शकता. मायलेज काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कारची, स्कूटरची टाकी पूर्ण भरावी लागेल. कारमध्ये शक्य तितके इंधन भरावे. उगाच कार हलवून हलवून इंधन भरू नये. 4 / 9यावेळी एक काळजी घ्यावी, तुम्ही नेहमी भरत असलेल्या पेट्रोल पंपावर, नेमही भरत असलेले इंधनच भरावे. म्हणजे रोजचाच पेट्रोल पंप असला तरी साधे आणि एक्स्ट्रा पावर वगैरे जे तुम्ही भरत असाल ते भरावे. 5 / 9गाडीची टाकी पूर्ण भरल्यावर, लगेचच वाहनाचे किलोमीटर नोंदवा आणि पुढे चला. आता कारची टाकी पुन्हा निम्म्यावर आली की तोच पेट्रोलपंप गाठा आणि इंधन भरा. तेव्हाही किलोमीटर रिडिंग नोंद करा. 6 / 9यावेळी किती लीटर पेट्रोल भरले गेले हे देखील नोंदवा. पुन्हा गाडी फिरवा, पुन्हा टाकी निम्म्यावर आली की तोच पेट्रोल पंप गाठा आणि प्रोसेस रिपीट करा. 7 / 9समजा जर तुमची कार हाफ टँक रिकामा झाला, त्या वेळात जर १०० किमी चालली आणि तो टँक फुल करताना 5 लीटर इँधन लागले तर तुमची कार 20Kmpl चे मायलेज देते.8 / 9आता दरवेळी तुम्हाला तसेच, तितका वेळ ट्रॅफिक लागेल असे नाही. किंवा नेहमी तुम्ही एकटेच, काही सामानाशिवाय फिराल असेही नाही. यामुळे हाफ टँक-फुल टँकची प्रक्रिया दोन-चार वेळा वेगवेगळ्या कंडीशनमध्ये करा. यानंतर हिशेब घाला, याची जी सरासरी येईल ते तुमचे मायलेज असेल. 9 / 9एक लक्षात घ्या, वाहतूक कोंडीत, सिग्नलला, कमी वाहतुकीच्या ठिकाणी आणि हायवेवर तुमची कार वेगवेगळ्या प्रमाणात इंधन वापरते. यामुळे याठिकाणी वेगवेगळे मायलेज मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक कार या ६० - ८० किमीच्या वेगाला जास्त मायलेज देतात. यामुळे रस्ता निवडताना आणि कार चालविताना ही काळजी नक्की घ्या.