Ninety One E Cycles : ४ मोड्स असलेली इलेक्ट्रीक सायकल लाँच; ३५ किमीची रेंज, किंमतही बजेटमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 12:45 IST
1 / 7भारतातील वेगाने वाढणाऱ्या सायकल ब्रँड Ninety One Cycles ने नवीन इलेक्ट्रीक सायकल Meraki S7 ची घोषणा केली आहे. मेराकीनंतर कंपनीची ही दुसरी ई-बाईक (सायकल) आहे. 2 / 7मेराकीमध्ये देण्यात आलेल्या सर्व फीचर्स व्यतिरिक्त नवीन इलेक्ट्रीक सायकलमध्ये 7-स्पीड गियरसेट, 5-मोड पेडल असिस्ट आणि एक स्मार्ट एलसीडी देण्यात आला आहे. याद्वारे वेगाची माहिती मिळण्यास मदत होते. जाणून घेऊया या सायकलबद्दल अधिक माहिती.3 / 7ही इलेक्ट्रीक सायकल मिडनाईट ब्लॅक, ग्रेसफुल ग्रे आणि इलेक्ट्रिक ऑरेंज या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रेन आणि डस्टप्रुफ असण्याव्यतिरिक्त ही सायकल 160mm डिस्क ब्रेक आणि हाय-ट्रॅक्शन नायलॉन टायरसह देखील येते. यात की-लॉक स्विचसह रुंद हँडलबार मिळतात.4 / 7ही इलेक्ट्रीक सायकल पूर्ण चार्ज केल्यावर 35 किमी पर्यंतची रेंज देईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसंच या सायकलचा टॉप स्पीड 20 किमी/तास आहे. 5 / 7या सायकलमध्ये चार रायडिंग मोड मिळतात. यामध्ये पेडल असिस्ट, थ्रॉटल मोड, पेडल मोड आणि क्रूझ मोड यांचा समावेश आहे. पेडल असिस्टमध्ये तुम्हाला पेडल वापरण्याच्या सोबतच इलेक्ट्रीक पॉवरही वापरू शकता. 6 / 7थ्रॉटल मोडमध्ये, तुम्ही ते इलेक्ट्रीक स्कूटरप्रमाणे ही सायकल चालवू शकता. यामध्ये तुम्हाला पेडल मारण्याची गरज नाही. परंतु या मोडमध्ये बॅटरीचा वापर अधिक होतो.7 / 7त्याच वेळी, पेडल मोडमध्ये, ते सामान्य सायकलसारखे काम करेल. या मोडमध्ये तुम्हाला फक्त पेडलच्या माध्यमातूनच सायकल चालवावी लागेल. क्रूझ कंट्रोलमध्ये सायकल 6 किमी/तास वेगाने सेट केली जाईल. कंपनीने या ई-सायकलची किंमत 34,999 रुपये इतकी निश्चित केली आहे.