Maruti New Car: मारुतीच्या नव्या कारची प्रतीक्षा संपली, फक्त ११ हजार रुपयांत बूक करा नवी कोरी कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 15:54 IST
1 / 10मारुती सुझुकीनं नव्या बलेनो कारच्या बुकींगला सुरुवात करत असल्याची घोषणा केली आहे. नवी बलोनो अत्याधुनिक फिचर्ससह उपलब्ध होणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 2 / 10मारुतीच्या सर्वाधिक लोकप्रिय कारमध्ये बलेनो कारचा देखील समावेश होतो. तुम्हाला या कारची अॅडव्हान्स बुकिंग करायची असल्यास अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये तुम्ही नवी बलेनो बुक करू शकणार आहात.3 / 10समोर आलेल्या माहितीनुसार कार बुकींग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नजिकच्या मारुती सुझुकी नेक्सा शोरुममध्ये जावं लागणार आहे. तसंच या कारची बुकींग तुम्ही मारुती सुझुकी नेक्साच्या वेबसाइटवरुनही करू शकणार आहात. 4 / 10नव्या बलेनोमध्ये हेड अपल डिस्प्ले असणार आहे. या सेगमेंटमध्ये हे फिचर पहिल्यांदाच देण्यात आलं आहे. हेड अप डिस्प्लेमुळे (HUD) ड्रायव्हरला रस्त्यावरुन आपलं लक्षं हटवण्याची गरज भासणार नाही. डिस्प्लेवरच स्पीडोमीटर आणि क्लायमेट कंट्रोलशी निगडीत महत्त्वाची माहिती पाहता येणार आहे. 5 / 10चालक आणि कारमध्ये बसलेल्या लोकांच्या सुरक्षेला अनुसरून HUD फिचर देण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. यामुळे कारच्या तांत्रिक क्षमता आणखी प्रबळ होणार आहे. 6 / 10मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे सिनीअर एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर (मार्केटिंग अँड सेल्स) शशांक श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रीमिअम हॅचबॅक कार आतापर्यंत १० लाखाहून अधिक विक्री करण्यात आल्या आहेत. 7 / 10आताच्या घडीला भारतीय बाजारपेठेत Maruti Suzuki चा दबदबा कायम आहे. प्रत्येक महिन्याला सुमारे सव्वा ते दीड लाख वाहने विकून मारुती अनेक महिन्यांपासून नंबर १ वर टिकून आहे. टाटासह अन्य कंपन्या मारुतीच्या आजूबाजूलाही नाहीत.8 / 10या कारमध्ये ब्लॅक, फ्रंट ग्रिल, इल्यूमिनिटेड हेडलॅम्प्स, DRLs आणि फॉग लॅम्प्स दिसत आहे. या कारचे प्रोडक्शन आधी पासूनच सुरू करण्यात आले आहे. गुजरात प्लांट मध्ये याचे प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर नेक्सा (NEXA) चे सिलेक्टेड डीलरशीपवर याची बुकिंग सुरू करण्यात आली आहे.9 / 10अपडेटेड बलेनो मध्ये अनेक डिझाइन आणि फीचर्स मध्ये खूप बदल पाहायला मिळू शकतो. इंजिन सेटअप मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. कारमध्ये आधीच्या प्रमाणे १.२ लीटर पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे.10 / 10अपकमिंग मारुती बलेनो फेसलिफ्टचे इंटिरियरमध्ये खूप काही नवीन दिसेल. ज्यात नवीन डॅशबोर्ड सोबत नवीन एसी कंट्रोल पॅनेल, नवीन एसी वेंट्स, सध्याच्या मॉडलपेक्षा मोठे फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सोबत अनेक नवीन स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळू शकतात.