नवीन अवतारात MG ची सर्वात स्वस्त SUV लॉन्च; किंमत 10 लाखांपेक्षा कमी, पाहा फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:05 IST
1 / 6JSW MG Motor ने Astor चे अपडेटेड व्हेरिएंट भारतात लॉन्च केले आहे. Astor ची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 17.56 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. Astor च्या नवीनतम मॉडेलमध्ये MY2024 मॉडेलच्या तुलनेत किरकोळ बदल आणि नवीन ब्रँडिंग करण्यात आले आहे. MG ने त्याच्या नवीन जाहिरातीत Astor ला ब्लॉकबस्टर SUV म्हणून ब्रँड केले आहे.2 / 6ही नवीन Astor अपडेटेड शाईन व्हेरियंटसह लॉन्च केली आहे. यात पॅनोरामिक सनरुफ मिळेल. याची किंमत रु. 12.48 लाख (एक्स-शोरूम) चीपासून सुरू होते. पॅनोरॅमिक सनरुफसह येणारी ही या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त SUV आहे. महत्बाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सर्व मॉडेल्समध्ये सहा एअरबॅग्स मिळतील.3 / 6याशिवाय आयव्हरी इंटीरियर थीम आता सर्व ॲस्टर मॉडेल्समध्ये दिसेल. फक्त टॉप-स्पेक सॅव्ही प्रो ला Sangria ट्रिमचा पर्याय मिळेल. इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, i-Smart 2.9 Advanced UI आणि फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स मिळतील.4 / 6इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, MG Astor मध्ये 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 6 स्पीकर ऑडिओ सिस्टम, 80 हून अधिक कनेक्टेड कार वैशिष्ट्ये, ऑटो डिमिंग IRVM आणि जिओची व्हॉइस रेकग्निशन सिस्टम यांसारखे वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने Astor ला 14 Level-2 Advanced Driver Assistance System (ADAS) वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत. 5 / 6नवीन Astor मध्ये सर्वात मोठा बदल इंजिन मध्ये दिसणार आहे. MG Motor ने लाइनअपमधून 1.3-लीटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन काढून टाकले आहे. Astor आता 1.5-लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते, जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 8-स्पीड CVT ऑटोमॅटिक युनिटशी जोडले गेले आहे. हे इंजिन 109 bhp चा पॉवर आणि 144 Nm चा पीक टॉर्क देते.6 / 6Hyundai Creta, Kia Seltos आणि Maruti Grand Vitara ही भारतीय बाजारपेठेतील कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय वाहने आहेत, परंतु त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी MG Motor ने Astor 2025 लॉन्च केले आहे.