शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:02 IST

1 / 6
मारुती सुझुकीने जीएसटी कमी होण्यापूर्वीच एसयुव्ही सेगमेंटमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. ग्रँड विटारापेक्षा मोठी एसयुव्ही कार पेट्रोल, हायब्रिड आणि सीएनजीमध्ये लाँच केली आहे. Maruti Victoris मध्ये सीएनजी टाक्या तर आहेत परंतू बुट स्पेसही मोठी आहे.
2 / 6
यामुळे ही कार टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटाचे मार्केट हादरवणार आहे. ही कार घ्यायची झाली तर किती डाऊनपेमेंट करावे लागेल, तसेच किती हप्ता म्हणजेच ईएमआय बसेल याची माहिती देण्यात येत आहे.
3 / 6
मारुती व्हिक्टोरिसचे बेस मॉडेल जर घेतले तर त्याची एक्स शोरुम किंमत १० लाख ४९ हजार रुपये आहे. तर ही कार ऑनरोड १२- सव्वा बारा लाखांच्या आसपास जाते.
4 / 6
अशावेळी जर तुम्ही २ लाखांचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला १०.४९ लाखांचे लोन करावे लागणार आहे. ऑनरोड किंमतीत 1.05 लाख रुपये आरटीओ आणि साधारण ५१ हजार रुपये इन्शुरन्स असणार आहे.
5 / 6
जर १०.४९ लाखांचे ऑटो लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी ९ टक्के व्याजाने 16,894 रुपयांचा हप्ता बसणार आहे. सात वर्षांत तुम्ही 3,69,057 व्याज भरणार आहात. म्हणजेच ७ वर्षांत तुम्ही एकूण कर्जाची परतफेड 14,19,057 रुपये करणार आहात.
6 / 6
सध्या व्याजदर कमी झालेला आहे. तुम्ही चांगल्या बँकेकडून, तुमचा सिबील चांगला असेल तर ८.५० टक्क्याने कर्ज घेतले तर 16,628 रुपयांचा ईएमआय बसणार आहे. 3,46,778 व्याज अशी एकूण 13,96,778 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत.
टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकी