शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 14:18 IST

1 / 6
Maruti Suzuki: सुजुकी मोटर कॉर्पोरेशनने पुढील 10 वर्षांसाठी आपला नवा पावरट्रेन रोडमॅप जाहीर केला आहे. या योजनेत इंटरनल कम्बशन इंजिन, बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल्स (BEVs) आणि हायब्रिड तंत्रज्ञान या तिन्ही घटकांचा समावेश आहे. कंपनीची ही धोरणात्मक योजना तिच्या कार्बन न्यूट्रॅलिटी (शून्य कार्बन उत्सर्जन) या दीर्घकालीन लक्ष्याशी सुसंगत आहे.
2 / 6
सुजुकीने स्पष्ट केले आहे की, जपान आणि युरोपमध्ये 2050 पर्यंत आणि भारतामध्ये 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन पूर्णपणे थांबविण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. ही 'मल्टी-पावरट्रेन स्ट्रॅटेजी' सुजुकीला पारंपरिक पेट्रोल इंजिन्ससोबत इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या विकासातही समान गुंतवणूक करण्याची मुभा देते.
3 / 6
या रोडमॅपनुसार सुजुकी आगामी काळात फ्युएल-एफिशिएंट हायब्रिड इंजिन्स, बायोफ्युएल (इथेनॉल) किंवा ई-फ्युएल तंत्रज्ञान असलेले मॉडेल्स, तसेच पूर्णपणे इलेक्ट्रिक व्हेईकल्स बाजारात उतरवणार आहे. कंपनीचा दावा आहे की, प्रत्येक देशाच्या इंधन इन्फ्रास्ट्रक्चर आणि ग्राहकांच्या गरजांनुसार विविध पावरट्रेन पर्याय देणे हे भविष्यातील टिकाऊ उपाय आहे.
4 / 6
मारुती सुजुकी इंडियाने मार्च 2026 पर्यंत 85% पर्यंत बायोएथेनॉल वापरू शकणारी FFV (Flex Fuel Vehicle) भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कंपनीने एप्रिल 2025 पासून E20 (20% इथेनॉल मिश्रण) सुसंगत इंजिन्स बाजारात आणले आहेत.
5 / 6
मारुती WagonR फ्लेक्स-फ्युएल प्रोटोटाइप डिसेंबर 2022 मध्ये सर्वप्रथम सादर झाली होती. ही कार 2023 च्या ऑटो एक्स्पो आणि 2024 च्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्येही दाखवण्यात आली होती. ही भारतातील पहिले मोठ्या प्रमाणावर तयार होणारे फ्लेक्स-फ्युएल कार मॉडेल ठरू शकते. ही E20 ते E85 इंधन मिश्रणावर (20 ते 85% इथेनॉल) चालण्यास सक्षम आहे. ही कार मारुती सुजुकी इंडिया आणि सुजुकी मोटर कॉर्पोरेशन, जपान यांच्या संयुक्त तांत्रिक सहकार्याने विकसित केली आहे.
6 / 6
कंपनी 2026 मध्ये E-Vitara इलेक्ट्रिक SUV आणि Fronx हायब्रिड कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर लॉन्च करून भारतात आपली मल्टीपावरट्रेन रणनीती अमलात आणेल. Fronx ही ब्रँडची पहिली हायब्रिड ऑफर असेल आणि त्यातून इन-हाऊस विकसित मजबूत हायब्रिड पावरट्रेन सिस्टमची सुरुवात होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुजुकीचे नवीन 'स्ट्राँग हायब्रिड सिस्टम' टोयोटाच्या Atkinson Hybrid Powertrain पेक्षा अधिक किफायतशीर ठरणार आहे. कंपनी हे नवीन हायब्रिड तंत्रज्ञान बलेनो, मिनी एमपीव्ही, नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट आणि ब्रेजामध्येही सामील करणार आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीcarकारAutomobileवाहन