शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maruti Alto चा 16 वर्षांपासूनचा रेकॉर्ड मोडला; आता नाही राहिली टॉप सेलिंग कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 16:02 IST

1 / 10
मारुतीच्या अल्टोने 2004-05 मध्ये मारुतीच्याच 800 कारचा सर्वाधिक खपाची कार असलेला किताब हिसकावला होता. एक वेळ अशी होती की सामान्यांची मर्सिडीज म्हटल्या जाणाऱ्या मारुती 800 चे भारतीय रस्त्यांवर एकछत्री राज्य होते.
2 / 10
दिवस तसेच राहत नाहीत म्हणतात ना अगदी तसेच घडले आहे. मारुती 800 चा किताब अल्टोने घेतला होता. तो आता मारुतीच्याच परंतू तिसऱ्या कारकडे गेला आहे.
3 / 10
मारुती ही देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. आज बाजारात आणि रस्त्यांवर मारुतीच्याच कारचा बोलबाला आहे. यानंतर ह्युंदाई आणि टाटाचा नंबर लागतो.
4 / 10
2010-11 मध्ये अल्टो ने तर एक नवा अध्याय लिहिला होता. या वर्षात मारुती अल्टोच्या 3,46,840 कार विकल्या गेल्या होत्या. जगातील सर्वाधिक खपाची कार म्हणून देखील Alto च्या शिरपेचात तुरा खोवला गेला होता.
5 / 10
गेली दोन वर्षे ऑटो इंडस्ट्रीसाठी खूप कठीण गेली. 2020-21 मध्ये मारुती Alto च्या 1,58,992 कार विकल्या गेल्या. ज्या 2019-20 मध्ये विकल्या गेलेल्या 1,90,814 कारपेक्षा 16.68 टक्के कमी आहेत.
6 / 10
आता अल्टोचा पहिला नंबर गेला आहे. अल्टोला मागे टाकून मारुती स्विफ्टने पहिला क्रमांक पटकाविला आहे. हे करण्यासाठी स्विफ्टला 8 वर्षांचा मोठा काळ लागला. 2012 च्या मे महिन्यामध्ये स्विफ्टने अल्टोला मागे टाकले होते. मात्र, वर्षाच्या विक्रीत अल्टोला मागे टाकण्यासाठी मारुतीला 8 वर्षे लागली. (Maruti Swift became top selling car in India. Alto lost its empire.)
7 / 10
2020-21 मध्ये स्विफ्टची 1,72,671 एवढी विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2019-20 मध्ये 1,87,916 विक्री झाली होती. ही विक्री 8.11 टक्क्यांनी कमी झाली आहे.
8 / 10
अल्टोची विक्री कमी होण्यास स्विफ्टच कारणीभूत नाहीय, 2019 मध्ये अल्टोचे 1 लीटर के 10 व्हर्जन बाजारातून बंद करण्यात आले आणि त्या जागी अल्टोसारखी एस-प्रेसो बाजारात आणली गेली. याचा परिणाम मारुती अल्टोच्या विक्रीवर झाला.
9 / 10
आता कार विक्रीच्या आकड्यांत पहिल्या 10 मध्ये मारुतीच्याच कार अधिक आहेत.
10 / 10
यामध्ये मारुती बलेनो, वॅगन आर, डिझायर, ह्युंदाई क्रेटा, मारुती इको, ह्युंदाई ग्रँड आय10, ब्रेझा आणि दहाव्या नंबरवर ह्य़ुंदाई व्हेन्यू अशा या कार आहेत.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन