1 / 8मारुती सुझुकीने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत सेलेरियोची नवीन जनरेशन लॉन्च केली आहे, जी आधीच्या मॉडेलच्या तुलनेत पूर्णपणे बदलण्यात आली आहे. या कारची विक्री सुरू होऊन फक्त 2 महिने झाले आहेत. आता कंपनीने या कारवर 26,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या आहेत. एएमटीचा समावेश असलेल्या सर्व व्हेरिएंटवर ही डिस्काउंट दिला जात आहे.2 / 8कंपनीने नुकतेच ग्राहकांच्या आवडत्या वॅगनआरचे 2022 मॉडेल लाँच केले आहे, जे नवीन फीचर्स आणि नवीन रंगांच्या पर्यायामध्ये आणले आहे. मात्र, कंपनीने कारच्या जुन्या मॉडेलवरील स्टॉक क्लिअर करण्यासाठी 31,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या आहेत. कारच्या 1.2-लीटर इंजिन मॉडेलवर 21,000 रुपयांपर्यंत आणि 1.0-लीटर इंजिन मॉडेलवर 31,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले आहेत.3 / 8ही बऱ्याच काळापासून कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या कारपैकी एक आहे. मारुती सुझुकी जवळपास 20 वर्षांपासून या परवडणाऱ्या हॅचबॅकची विक्री करत आहे. या पैसा वसूल कारवर ग्राहक 24,000 रुपयांपर्यंत लाभ घेऊ शकतात, तर ऑल्टोच्या बेस एसटीडी व्हेरिएंटवर 11,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळत आहेत.4 / 8कंपनीने या कारला सर्वोत्कृष्ट फीचर्सने सुसज्ज केले आहे. ग्राहकांमध्ये ती खूप पसंत केली जात आहे. एस-प्रेसोवर 31,000 रुपयांपर्यंतच्या कमाल ऑफर देण्यात आल्या आहेत, ज्या कारच्या स्टँडर्ड व्हेरिएंटवर दिल्या जात आहेत. मारुती सुझुकीने एस-प्रेसोच्या एएमटी व्हेरिएंटवर 16,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स उपलब्ध केल्या आहेत.5 / 8मारुती सुझुकी स्विफ्ट ग्राहकांच्या आवडत्या कारपैकी एक आहे. अनेक फीचर्ससह येते आणि याच्या किंमतीनुसार, ही एक पैसे वसूल हॅचबॅक आहे. कंपनीने या कारवर एकूण 25,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या आहेत, तर कारच्या एएमटी व्हेरिएंटवर 17,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट्स दिला आहे.6 / 8मारुती सुझुकी डिझायर कारचा कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये समावेश आहे. मारुती सुझुकीने या सेडानवर एकूण 22,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला आहे, जो मॅन्युअल व्हेरिएंटवर दिला जात आहे. कारचा एएमटी व्हेरिएंटवर एकूण 17,000 रुपयांपर्यंत लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे.7 / 8मारुती सुझुकीने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत सेलेरियोची नवीन जनरेशन लॉन्च केली आहे, जी आधीच्या मॉडेलच्या तुलनेत पूर्णपणे बदलण्यात आली आहे. या कारची विक्री सुरू होऊन फक्त 2 महिने झाले आहेत. आता कंपनीने या कारवर 26,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या आहेत. एएमटीचा समावेश असलेल्या सर्व व्हेरिएंटवर ही डिस्काउंट दिला जात आहे.8 / 8मारुती सुझुकी लवकरच बाजारात नवीन 2022 व्हिटारा ब्रेझा लाँच करण्यासाठी तयार आहे आणि यापूर्वी स्टॉक क्लिअर करण्यासाठी, कंपनीने त्यावर एकूण 22,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला आहे. ही देखील कंपनीची पैसा वसूल एसयूव्ही आहे आणि ती खूप विकली जाते.