शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मारुतीच्या 'या' गाड्यांवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, होईल मोठी बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 14:54 IST

1 / 6
नवी दिल्ली : २०२१ वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. वर्षाच्या शेवटी अनेक वाहन कंपन्या खूप चांगल्या ऑफर्स देतात. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर अशावेळी ती खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी आपल्या कारवर सूट देत आहे. आज आम्ही काही सर्वोत्तम कार डीलबद्दल सांगणार आहोत.
2 / 6
मारुतीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक ऑल्टोवर कंपनी भरपूर सूट देत आहे. कंपनी मारुती ऑल्टोच्या STD प्रकारांवर या महिन्यात 20,000 रुपयांची रोख सूट देत आहे. मारुती ऑल्टो खरेदी केल्यास एकूण 38 हजार रुपयांची बचत होऊ शकते. उर्वरित ट्रिम्सवर तुम्ही 30,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचे एक्सचेंज डिस्काउंट आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस मिळवू शकता.
3 / 6
मारुती सुझुकी डिसेंबर 2021 मध्ये S Preso च्या पेट्रोल आणि सीएनजी BS6 व्हेरिएंटवर 33,000 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. यात पेट्रोल इंजिन मॉडेलवर 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.
4 / 6
मारुती वॅगन आर या कारच्या पेट्रोल आणि सीएनजी व्हर्जनवर तुम्ही 33,000 रुपयांपर्यंतचे फायदे घेऊ शकता. यामध्ये कंपनी 20,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.
5 / 6
डिसेंबर 2021 मध्ये मारुती ईकोवर कंपनी 27,500 रुपयांपर्यंत एकूण लाभ देत आहे. पेट्रोल इंजिन मॉडेलमध्ये 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 2500 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.
6 / 6
कंपनी डिसेंबर 2021 मध्ये मारुती सेलेरियोवर 15,000 रुपयांची सूट देत आहे. यामध्ये 5000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन