शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:23 IST

1 / 6
Maruti Dzire: केंद्र सरकारने GST २.० अंतर्गत चारचाकीवरील कर मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. यामुळे देशातील सर्वात लोकप्रिय सेडानपैकी एक असलेली Maruti Dzire स्वस्त झाली आहे. जीएसटी कपातीनंतरच्या नवीन किमती येत्या २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत. तुम्ही येत्या काळात मारुती डिझायर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जीएसटी कपातीनंतर ही कार किती स्वस्त होणार आहे, हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
2 / 6
नवीन कर सुधारणांनुसार, १२०० सीसी पर्यंतच्या पेट्रोल वाहनांवर आणि १५०० सीसी पर्यंतच्या डिझेल वाहनांवर (४ मीटरपेक्षा कमी लांबी) आता १८ टक्के जीएसटी आकारला जाईल. पूर्वी त्यावर २८ टक्के कर लागू होता. मारुती डिझायरसारख्या कॉम्पॅक्ट सेडान ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे.
3 / 6
मारुती डिझायर किती स्वस्त होईल? मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती डिझायरच्या सर्व मॉडेल्सच्या किमतींवर ८.५ टक्क्यांची घट होईल. सर्वात मोठा फायदा ZXI Plus पेट्रोल-ऑटोमॅटिक मॉडेलवर होईल. या मॉडेलची किंमत सुमारे ८६,८०० रुपयांनी कमी होईल. उर्वरित मॉडेल्सवरही ६०,००० ते ८०,००० रुपयांची कपात शक्य आहे.
4 / 6
मारुती डिझायरचे फिचर्स... नवीन मारुती डिझायर ९-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह येते. वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स आणि स्मार्ट की सारखी वैशिष्ट्ये कारला प्रीमियम टच देतात.
5 / 6
मारुती सुझुकी डिझायरने सुरक्षिततेच्या बाबतीत एक मोठा टप्पा गाठला आहे. यात ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड असिस्ट आणि रिअर पार्किंग सेन्सर अशी वैशिष्ट्ये आहेत. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला कुटुंब सुरक्षेच्या बाबतीत ५-स्टार रेटिंग मिळाले आहे.
6 / 6
डिझायर किती मायलेज देते? डिझायरचे मायलेज हे नेहमीच त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य राहिले आहे. मॅन्युअल ट्रान्समिशनसह ही २४.७९ किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते, तर ऑटोमॅटिक व्हर्जन २५.७१ किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीcarकारAutomobileवाहनGSTजीएसटी