नव्या कारवर ४.१० लाखांच्या बचतीसाठी शेवटचा दिवस, आजच करु शकता बेस्ट डील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 14:05 IST
1 / 8Car Discounts: तुम्ही जर नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज काही कारवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. 2 / 8कार कंपन्यांचे स्टॉक क्लिअर करण्यासाठी कार कंपन्या मोठी सूट देत आहेत. जर तुम्ही आज नवी कार घेणार असाल तर तुम्हाला ४.४० लाख रुपयांपर्यंतच्या बचतीचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला मारुती सुझुकी, एमजी, टाटा मोटर्स आणि ह्युंदाई मोटर इंडियाच्या कारवर मिळणा-या सवलतींबद्दल माहिती देत आहोत.3 / 8Hyundai Verna वर या महिन्यात ३५,००० रुपयांची सूट दिली जात आहे, यात १५,००० रोख लाभ आणि २०,००० रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. 4 / 8याशिवाय अल्काझारवर सर्वाधिक ८५,००० रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये ५५,००० रुपयांचा रोख लाभ आणि ३०,००० रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. या सवलतींबद्दल अधिक माहितीसाठी Hyundai डीलरशीपशी संपर्क साधा. या ऑफर केवळ ३१ जुलैपर्यंत किंवा स्टॉक टिकेपर्यंत वैध आहेत.5 / 8MG मोटरची सर्वात महागडी फुल साइज SUV Gloster वर ४.१० लाख रुपयांची सूट मिळत आहे. पण ही ऑफर त्याच्या २०२३ मॉडेलवर दिली जात आहे. कारण अजूनही हा स्टॉक संपलेला नाही.6 / 8तर २०२४ मॉडेलवर ३.३५ लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या संपूर्ण सवलतीमध्ये एक्सचेंज, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. ही सवलत ३१ जुलैपूर्वीच घेता येईल. ऑफरबद्दल अधिक तपशीलांसाठी डीलरशीपशी संपर्क साधा.7 / 8Maruti Jimny वरही मोठी सूट मिळत आहे. याक कारवर ३.३० लाख रुपयांची सूट मिळत आहे. Jimnyची किंमत १२.७४ लाख ते १४.९५ लाख रुपयांपर्यंत आहे. Jimny आता MSSF स्किम अंतर्गत २.७५ लाखांपर्यंतचे फायदे मिळतात. जिमनीच्या टॉप व्हेरिएंट Alpha वर १.८० रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स (MSSF) निवडणाऱ्या खरेदीदारांसाठी १.५० लाख रुपयांची अतिरिक्त सूट आहे.8 / 8या महिन्यात टाटा मोटर्सच्या नेक्सॉनवर ६०,००० रुपयांची सूट मिळत आहे. या सवलतीमध्ये एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट देखील समावेश आहे. याशिवाय Tata Tigor वर या महिन्यात ५५,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Tigor CNG वर २५,००० रुपयांची सूट उपलब्ध आहे. तर Tata Harrier वर ३८,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. याशिवाय हॅचबॅक कार Altroz वर २५,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.